नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात आर्थिक गैरव्यवहार आणि नवीन नोटांचे बंडल जप्त केल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने आता सर्व बँकांना निर्देश दिले आहेत. बँकांनी कॅश काऊंटर आणि मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत आणि ८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबरपर्यंतचे फुटेज सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी असे निर्देश आरबीआयने दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबररोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. यानिर्णयानंतर पाचशे आणि हजारच्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेबाहेर रांगा लागल्या आहेत. विशेष म्हणजे महिनाभरानंतर सर्वसामान्यांना चलनतुटवडा जाणवत असला तरी दुसरीकडे आयकर विभागाला नवीन नोटांचे बंडल आढळत आहेत. आत्तापर्यंत देशाच्या विविध भागांमधून कोट्यावधी रुपयांच्या नवीन नोटा सापडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना सुचना दिल्या आहेत. यामध्ये नवीन नोटांच्या वितरणाचा तपशील ठेवण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत. याशिवाय बँकेच्या आत महत्त्वाच्या ठिकाणी उदा. प्रवेशद्वार, हॉल आणि कॅश काऊंटर हे सीसीटीव्ही कॅमे-याच्या देखरेखीखाली असतील याची दक्षता घ्यावी असे आरबीआयच्या पत्रकात म्हटले आहे.

मंगळवारी दुपारी आरबीआयच्या अधिका-यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली. नागरिकांनी पैसे स्वतःकडे ठेवण्याऐवजी ते बाजारात चलनात आणावे असे आवाहन आरबीआयने पत्रकार परिषदेत केले आहे. आम्ही दररोज जास्तीत जास्त नोटांचे वितरण होईल याची दक्षता घेत आहोत असे आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर आर गांधी यांनी सांगितले.  १० नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत बँक आणि एटीएमच्यामार्फत ४ लाख ६१ हजार कोटी रुपयांच्या नोटा बाजारात आणल्या असे आरबीआयने सांगितले. याच कालावधीत पाचशे आणि दोन हजारच्या १.७ अब्ज रुपयांच्या नोटा बाजारात आणल्याचे आरबीआयने नमूद केले आहे. नोटाबंदीनंतर आत्तापर्यंत १२. ४४ लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत जमा झाल्या आहेत अशी माहिती बँकेने दिली. रिझर्व्ह बँकेची आर्थिक गैरव्यवहारांवर करडी नजर असल्याचे सांगत अॅक्सिस बँकेचा परवाना रद्द करण्याचा विचार नाही असा पुनरुच्चार आरबीआयने केला आहे. बंगळुरुमध्ये सीबीआयने आरबीआयच्या अधिका-याला नोटा बदलून दिल्याप्रकरणी