नवी दिल्ली : गेल्या वर्षभरापासून अशांत असलेल्या मणिपूरमध्ये माजी केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. मंगळवारी मणिपूरसह केरळ तसेच बिहारमध्ये नवे राज्यपाल नेमण्यात आले. ओडिशाचे राज्यपाल रघुबर दास यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे.

हेही वाचा >>> Political Year Ender 2024 : कुठे निवडणुका तर कुठे राजकीय भूकंप, देशात २०२४ मध्ये कोणत्या पाच मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या!

Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
Rajya Sabha Winter Session.
Parliament Session : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा सुटेना? आता शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही अद्याप…”
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

सर्वाधिक काळ गृहसचिव राहिलेल्या भल्ला यांच्यावर मणिपूर जबाबदारी देण्यात आली आहे. मे २०२३ पासून वांशिक संघर्ष सुरू असताना तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अपयश आल्याबद्दल गृह विभागावर टीकाही झाली होती. असे असताना आता याच काळात गृहसचिव असलेल्या भल्लांना मणिपूरचे राज्यपालपद देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

ओडिशात दास यांच्या जागी मिझोरामचे राज्यपाल हरि बाबू कंभपती यांची नियुक्ती करण्यात आली, तर केरळचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान यांच्याकडे बिहारचे राज्यपालपद सोपवण्यात आले आहे. राज्यातील डाव्या आघाडीच्या सरकारविरोधात खान यांचा संघर्ष सुरू आहे. यापूर्वीचे बिहारचे राज्यपाल असलेले राजेंद्र आर्लेकर यांच्यावर केरळची जबाबदारी असेल. तर मिझोरामच्या राज्यपालपदी माजी लष्करप्रमुख व्ही.के.सिंह यांना नेमण्यात आले. नवे राज्यपाल पदभार स्वीकारतील त्या दिवसापासून ही नियुक्ती असेल असे राष्ट्रपती भवनाने स्पष्ट केले आहे.

भल्ला हे सर्वाधिक काळ गृहसचिवपदी होते. या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांनी पाच वर्षे पूर्ण केली. आसाम-मेघालय केडरचे १९८४ च्या तुकडीचे ते भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. व्ही.के.सिंह हे दोन वेळा केंद्रात मंत्री होते. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधून ते २०१४ व १९ मध्ये निवडून आले होते.

Story img Loader