इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध चालू असल्यानं जगभर चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच इराक आणि सीरियात अमेरिकनं सैनिकांवर हल्ले करण्यात आल्याचा दावा पेंटागॉननं केला होता. यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इराणचे सर्वोच्च नेते, आयतुल्ला अली खामेनेई यांना थेट इशारा दिला आहे.
हमास या दहशतवादी संघटनेनं ७ ऑक्टोबरला इस्रायलवर हल्ला केला होता. यानंतर मध्यपूर्वेत संघर्ष वाढण्याची भीती अमेरिकेला वाटत आहे. या भागात अतिरिक्त लष्कर तैनात करण्यात आलं आहे.
हेही वाचा : पाकिस्तान भिकाऱ्यांची निर्यात करणारा देश कसा बनला? परदेशात ९० टक्के भिकारी पाकिस्तानचे
अशातच गेल्या आठवड्यात इराक आणि सीरियात अमेरिकेच्या सैन्यावर हल्ले झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर बुधवारी बायडेन यांनी आयातुल्ला अली खामेनी यांना इशारा दिला. सैन्यावर हल्ले होत राहिल्यास जशास तसे प्रत्युत्तर देण्यात येईल, असं बायडेन यांनी सांगितलं.
हेही वाचा : भारतीय तेल कंपन्यांचा इराककडे ओढा
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बायडेन म्हणाले, “यापुढं सैन्यावर हल्ले सुरूच ठेवले, तर आम्हीही प्रत्युत्तर देऊ. त्यासाठी तयार राहावे, असं आयातुल्लांना सांगितलं आहे. याचा इस्रायलशी काहीही संबंध नाही.”