राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचा दोन दिवसांचा नियोजित महाराष्ट्र दौरा रद्द करण्यात आल्याची अधिकृत माहिती राष्ट्रपती भवनातून देण्यात आली आहे. राष्ट्रपतींचा दौरा रद्द झाल्याचे कोणतेही अधिकृत कारण अद्याप समजू शकले नसले तरी बाळासाहेबांची प्रकृती चिंताजनक असल्याच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. आज (गुरूवार) मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जमनालाल बजाज पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती उपस्थित राहणार होते. त्यानंतर उद्या शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या एका कार्यक्रमासाठी ते जाणार होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: President cancels visit to maharashtra