नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी अंतराळातील कचऱ्याबाबत चिंता व्यक्त केली. अंतराळात असंख्य उपग्रह सोडण्यात येत असल्याने अंतराळ कचऱ्यात वाढ होत आहे, असे त्या म्हणाल्या. २०३० पर्यंत भविष्यातील अंतराळ मोहिमा कचरामुक्त करण्याचे लक्ष्य ठेवल्याबद्दल राष्ट्रपतींनी इस्राोचे कौतुकही केले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
भारताच्या चंद्रयान-३ प्रकल्पाच्या अवतरणाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या समारंभात मुर्मू बोलत होत्या. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्राो) अध्यक्ष एस सोमनाथ आणि अभियंते, शास्त्रज्ञ उपस्थित होते.
First published on: 24-08-2024 at 05:51 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: President draupadi murmu expressed concern about space debris amy