आंध्रप्रदेश विधानसभेत स्वतंत्र तेलंगणबाबत मांडण्यात आलेल्या विधेयकावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रपीत प्रणव मुखर्जी यांनी आज आणखी सात दिवसांची मुदत दिली आहे.
या विधेयकावर चर्चा करण्यची अंतिम तारिख २३ जानेवारी होती. त्यानंतर आंध्र प्रदेश सरकारने विधेयकावर चर्चा करण्यासाठी आणखी सात दिवसांची मुदत राष्ट्रपतींकडे मागितली होती. यावर राष्ट्रपतींनी ३० जानेवारीपर्यंत चर्चा करण्यास मुदत दिली आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, हे विधेयक विधानसभेत मांडण्यात आल्यावर मोठा गोंधळ उडाला होता. त्यात काही नेत्यांना बोलता आले नव्हते. विधानसभेत आता पुन्हा हे विधेयक मांडण्यात येणार आहे. यावर सविस्तर चर्चा करून नंतर ते केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.

Story img Loader