Joe Biden Issues Pardon For Hunter Biden : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांचा मुलगा हंटर बायडन यांना बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याबद्दल आणि कर चुकवेगीरी प्रकरणात माफी दिली आहे. विशेष म्हणजे बायडेन आपल्या मुलाची शिक्षा कमी करणार नाहीत किंवा त्याला माफ करणार नाहीत, असे व्हाईट हाऊसकडून सातत्याने सांगितले जात होते.

व्हाईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनानुसार, बायडेन म्हणाले, “आज मी माझा मुलगा हंटर याच्या क्षमा याचिकेवर स्वाक्षरी केली. मी पदभार स्वीकारल्याच्या दिवसापासून न्याय विभागाच्या निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप करणार नाही असे सांगितले होते आणि मी माझे वचन पाळले आहे.”

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
Arvi Constituency, Amar Kale Wife Mayura Kale,
आर्वीत उमेदवार पत्नीसाठी पती, तर उमेदवार पतीसाठी पत्नी मैदानात
Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
Prakash Ambedkar, Vanchit Bahujan Aghadi Candidate pune, Vanchit Bahujan Aghadi,
“भाजपचा आरक्षण संपविण्याचा मोठा डाव”, कोणी केला हा गंभीर आरोप ?
uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?

बायडेन यांचा यू-टर्न

जूनमध्ये, हंटर बायडेन यांना डेलावेअर गन प्रकरणात खटल्याला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी जो बायडेन यांनी, ज्युरींच्या निर्णयाचे पालन करत हंटर यांना माफ करणार नाहीत, असे म्हटले होते. दरम्यान यंदाच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवत माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दमदार पुनरागम केले आहे. ट्रम्प यांच्या विजयनानंतर काही दिवसांनी, व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी करीन जीन-पिअरे यांनी हंटर बायडेन यांना क्षमा मिळणार नाही, असे म्हटले होते. मात्र, रविवारी संध्याकाळी जो बायडेन यांनी हंटर बायडेन यांच्या क्षमा याचिकेवर स्वाक्षरी केली. यावेळी जो बायडेन यांनी आपल्या मुलाविरोधातील खटला राजकीय हेतून प्रेरित असल्याचा आरोपही केला.

हे ही वाचा : संभलमधील मशिदीचे व्यवस्थापन सोपवा; पुरातत्त्व खात्याचा न्यायालयात युक्तिवाद

बायडेन यांचे निवेदन

यावेळी हंटर बायडेन यांना माफी देण्याच्या निर्णयाचा बचाव करताना जो बायडेन म्हणाले, “हंटरवरील आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरित आहेत. मला राजकीयदृष्ट्या फटका बसावा या उद्देशाने ते करण्यात आले होते. काँग्रेसमधील माझ्या अनेक राजकीय विरोधकांनी माझ्या निवडणुकीला विरोध करण्यासाठी हे आरोप केले आहेत. हंटरच्या प्रकरणांची वस्तुस्थिती पाहणारी कोणतीही व्यक्ती हंटर केवळ माझा मुलगा आहे म्हणून त्याच्यावर आरोप झाले, याशिवाय इतर कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नाही.”

हंटर बायडेन यांच्यावरील आरोप

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचा मुलगा हंटर बिडेन यांच्यावर करचुकवेगिरीपासून बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगणे, सरकारी पैशांचा गैरवापर आणि खोटी साक्ष देणे यासारखे आरोप आहेत. दरम्यान हंटर बायडेन यांनी डेलावेअर न्यायालयात कर फसवणूक आणि बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याचा आरोप स्वीकारला होता.

हंटर बायडेन परदेशी कंपन्यांसाठी लॉबीस्ट, वकील आणि सल्लागार म्हणून काम करतात. यासह ते गुंतवणूक बँकर आणि कलाकारही आहेत.