राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी (२८ मार्च) २०२२ च्या पद्म पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार प्रदान करत सन्मानित केलं. यात हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांच्यापासून टोकिओ ऑलम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावणाऱ्या निरज चोप्रापर्यंत अनेकांचा समावेश आहे. प्रभा अत्रे आणि कल्याण सिंह यांना पद्मविभूषण, तर भारत बायोटेकचे कृष्णा एला आणि सुचित्रा एला यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. कल्याण सिंह यांना मरणोत्तर पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. निरज चोप्राला पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याशिवाय टोकिओ पॅरालम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेता बॅडमिंटनपटू प्रमोद भगत आणि भालाफेकपटू सुमित अंतिलला पद्मश्री, गायिका सुलोचना चवन यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आयरलँडचे प्राध्यापक रुट्गर कोर्टेनहोर्स्ट यांना आयरिश शाळांमध्ये संस्कृत भाषेच्या प्रसाराच्या प्रयत्नांसाठी पद्मश्री देण्यात आला. प्रसिद्ध बॉलिवूड गायक सोनू निगमला देखील पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.

हेही वाचा : मरणोत्तर अशोक चक्राने सन्मानित झालेले ASI बाबूराम कोण होते? २८ दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या वीराची शौर्यगाथा

पुरस्कार प्रदान सोहळा पाहा :

या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनी केली जाते. यंदा एकूण १२८ पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. यात दोन जोडप्यांचा समावेश आहे. या पुरस्कारांमध्ये ४ पद्मविभूषण, १७ पद्मभूषण आणि १०७ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार्थींमध्ये ३४ महिलांसह १० परदेशी व्यक्तींचा समावेश आहे. १३ व्यक्तींना मरणोत्तर सन्मानित करण्यात आलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: President kovind presents padma awards at 2022 civil investiture ceremony pbs