President Murmu to visit Maha Kumbh Mela : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभमेळ्याला आतापर्यंत कोट्यवधि भाविकांनी भेट दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्रिवेणी संगमावर जाऊन अमृतस्नान केले. आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूही उद्या सोमवारी (१० फेब्रुवारी) महाकुंभमेळ्याला जाणार आहेत. राष्ट्रपती भवन कार्यालयातून ही माहिती मिळाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पौष पौर्णिमेला (१३ जानेवारी) सुरू झालेला महाकुंभ हा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेळावा आहे, जो जगभरातील भाविकांना आकर्षित करतो. हा मेळा २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीपर्यंत सुरू राहील.

“प्रयागराज येथील त्यांच्या एकदिवसीय दौऱ्यादरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संगम येथे पूजा करून पवित्र स्नान करतील. अक्षयवट आणि हनुमान मंदिरात पूजा आणि दर्शन घेतील. तसंच डिजिटल कुंभ अनुभव केंद्राला देखील भेट देतील”, असे राष्ट्रपती भवनाने रविवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.संगम हे गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचे संगम आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: President murmu to visit maha kumbh mela on monday take holy dip at sangam sgk