देशाच्या प्रमुखपदी असूनही एका सामान्य व्यक्तीप्रमाणे वावरण्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या सवयशी सर्व परिचीत आहेत. ते केव्हा कोणती गोष्ट करतील याची कोणालाच काही कल्पना नसते. सध्या ओबामा व्हिएतनाम दौऱयावर आहेत. तेथेही त्यांनी सर्वांना आश्यर्यचकीत करून सोडले.
व्हिएतनामच्या हनोई शहरातून जात असताना ओबामा यांना भूक लागली. मग काय त्यांनी शेफ अँथनी बौर्डेन यांना सोबत घेतले आणि हनोईतील एका गल्लीत रस्त्याच्या कडेला असलेल्या छोटेखानी हॉटेलमध्ये जाऊन खाद्यपदार्थांवर ताव मारला. हनोई शहरातील एका छोट्याश्या गल्लीत बराक ओबामा यांच्या गाड्यांचा ताफा शिरला तेव्हा सर्वांचे लक्ष या ताफ्याकडे होते. तेवढ्यात गाडीतून बराक ओबामा बाहेर पडले आणि सर्व आश्चर्यचकीत झाले. बराक ओबामा यांनीही अतिशय सहजपणे सर्वांना प्रतिसाद देत हॉटेलमध्ये प्रवेश केला आणि पोटभरून जेवणसुद्धा केले.
बराक ओबामा यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्यासोबत असलेल्या सुरक्षारक्षकांना देखील सुरूवातीला काहीच कळले नव्हते. ओबामा हॉटेलमध्ये गेल्यानंतर सुरक्षारक्षकांनी तेवढ्यावेळेपुरता संबंधित रस्ता दोन्ही ताब्यात घेतला होता. हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर ओबामा यांनी हॉटेल मालकाला जेवणाचे बिल देखील दिले.

Story img Loader