इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेविरुद्धचा लढा अद्यापही कठीण असल्याचे मान्य करतानाच, हा क्रूर दहशतवादी गट अमेरिका नष्ट करेल आणि या प्रयत्नात सीरियातील संघर्षांचा मोठा वाटा असेल, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे.
आयसिसविरुद्धची लढाई कठीणच असणार आहे. मात्र आमच्या समुदायांची ताकद आणि अमेरिकन म्हणून आमची तत्त्वे यासह आमच्या राष्ट्रीय ताकदीचे सर्व घटक आम्ही उपयोगात आणू. विजय आमचाच होईल याबद्दल माझी खात्री आहे, असे ओबामा म्हणाले.
आयसिस या क्रूर दहशतवादी संघटनेला आम्ही नेस्तनाबूत करू, तसेच ज्यांना अधिक चांगले व सुरक्षित भवितव्य हवे आहे अशा जगभरातील सर्वासोबत काम करू, असे ओबामांनी त्यांच्या आठवडी भाषणात सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सीरिया व इराकमधील परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची असल्याचे सांगून ओबामा म्हणाले, की सीरियामध्ये अमेरिकेचे कमांडो ‘सीरियन डेमॉक्रॅटिक फोर्सेस’ या कुर्दिशबहुल गटासह इतर आयसिसविरोधी सैनिकांच्या साथीने लढत आहेत. शहरी भागात आयसिस वेढला गेला असून तो निष्पाप नागरिकांना मानवी ढाल म्हणून वापरत आहे. ही सर्व आव्हाने असली, तरी आम्ही प्रगती करत आहोत असे मी सांगू शकतो. सर्व आघाडय़ांवरील आमची मोहीम तीव्र करण्याचा आदेश गेल्याच आठवडय़ात मी आमच्या पथकाला दिले आहेत.
अरब भागीदारांसह ६६ देशांची आघाडी दिवसेंदिवस मजबूत होत असून आणखी काही देश आयसिसविरोधी लढय़ात योगदान देत आहेत. इराकमध्ये आयसिसच्या ताब्यात पूर्वी असलेल्या भूप्रदेशापैकी ४० टक्क्यांहून अधिक भाग आयसिसने गमावला आहे. सीरियात स्थानिक फौजांची आघाडी रक्का या आयसिसच्या बालेकिल्ल्यावरील पकड आवळत आहे. आम्ही आयसिसच्या तेलविहिरींवर हल्ले करत असल्याने त्यांना त्यांच्या सैनिकांचे पगार कमी करणे भाग पडले आहे, असेही ओबामा म्हणाले.
आयसिसचा अंतिमरीत्या पाडाव करण्याचा एकमेव मार्ग सीरियातील नागरी युद्ध आणि अनागोंदी संपवणे हा आहे, कारण त्यावरच आयसिसचे अस्तित्व आहे, असेही ओबामा यांनी सांगितले.