गेल्या महिन्याभरापासून तैवानच्या मुद्द्यावरून भारतीय उपखंडातील वातावरण तणावपूर्ण झालं आहे. चीननं सातत्याने तैवानवर आपला हक्क सांगितला असताना चीन कोणत्याही क्षणी हल्ला चढवू शकतो, अशी भिती तैवानच्या संरक्षणमंत्र्यांनी त्यांच्या संसदेत व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर तैवानच्या मुद्द्यावरून चीनच्या विरोधात अमेरिका, युरोपियन युनियन आणि ऑस्ट्रेलिया उभे ठाकले असताना आता अमेरिकेने चीनला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या भेटीमध्ये अमेरिकेने अनेक बाबतीत चीन सरकारला सुनावलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जो बायडेन, जिनपिंग यांची ऑनलाईन बैठक

गेल्या काही महिन्यांपासून या दोन्ही देशांमधले संबंध तणावपूर्ण राहिले आहेत. करोना काळात देखील चीनवर जगभरातून टीका करण्यात येत होती. त्यात तैवानच्या मुद्द्यामुळे अमेरिकेने चीनविरोधात उघड भूमिका घेतलेली आहे. दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये आज झालेल्या बैठकीमध्ये तैवान, हाँगकाँग आणि शिनजियांग प्रांतात चीन करत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनावरून देखील जो बायडेन यांनी सुनावलं आहे.

बैठकीनंतर व्हाईट हाऊसकडून जाहीर करण्यात आलेल्या पत्रकामध्ये बैठकीदरम्यान अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आलेल्या भूमिकेबाबत माहिती दिली आहे. यानुसार, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना अर्थात चीनमधील सत्ताधारी पक्षाकडून शिनजियांग, तिबेड आणि हाँगकाँगमध्ये केल्या जात असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाविषयी चिंता व्यक्त केली आहे. त्यासोबतच, तैवानच्या मुद्द्यावरून जो बायडेन यांनी अमेरिकेची भूमिका शी जिनपिंग यांना स्पष्ट शब्दांत सांगितली आहे.

अमेरिकेनं केली भूमिका स्पष्ट

“तैवानच्या मुद्द्यावरून राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेची भूमिका स्पष्ट करून सांगितली आहे. तैवानच्या पट्ट्यामध्ये अशांतता आणि अस्थैर्य निर्माण करण्याच्या कोणत्याही प्रयत्नाला अमेरिकेचा ठामपणे विरोध असेल”, असं जो बायडेन यांनी या बैठकीत शी जिनपिंग यांना स्पष्ट केल्याचं व्हाईट हाऊसकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

“चीन हल्ल्यासाठी पूर्णपणे सज्ज, २०२५मध्ये…”, तैवाननं दिला गंभीर इशारा!

गेल्या ४० वर्षांतला सर्वाधिक तणाव!

तैवानच्या संसदेमध्ये यासंदर्भात चर्चा सुरू असताना तैवानचे संरक्षण मंत्री चियू कुओ चेंग यांनी यासंदर्भात भिती व्यक्त करतानाच गंभीर इशारा दिला आहे. “चीनसोबत असलेला लष्करी तणाव गेल्या ४० वर्षांत सध्या सर्वाधिक वाढला आहे. तैवान स्ट्रेट भागामध्ये चीनकडून मिसफायर होण्याची शक्यता देखील वाढली आहे. संपूर्ण तैवानवर ताबा मिळवण्यासाठी आवश्यक असलेली शस्त्रास्त्र आत्ताच चीनकडे आहेत. पण इतर आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता चीन २०२५मध्ये तैवानवर संपूर्ण ताबा मिळवण्यासाठी हल्ला करण्याची शक्यता आहे”, असं चेंग म्हणाले आहेत.