पीटीआय, नवी दिल्ली : यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ाला इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतेह अल-सीसी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गेल्या महिन्यात इजिप्तला दिलेल्या भेटीदरम्यान अब्देल फतेह अल -सीसी यांना भारताकडून औपचारिक आमंत्रण दिले होते. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ाला पहिल्यांदाच इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची शक्यता आहे. करोना संसर्गामुळे २०२१ आणि २०२२ या दोन वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ासाठी भारताकडून कोणत्याही देशाच्या नेत्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले नव्हते.

Story img Loader