President Draupadi Murmu Speech : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित केले. देशातील जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी संविधान, पर्यावरण, शेतकरी, डिजिटल पेमेंट, शिक्षण आणि भारतीय क्रिडापटूंच्या गेल्या वर्षी झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील कामगिरीसह बिद्धिबळपटू डी. गुकेशच्या विश्वविजेतेपदावर भाष्य केले. यावेळी त्या म्हणाल्या, “गेल्या वर्षी, आपल्या खेळाडूंनी ऑलिंपिकमध्ये चांगली कामगिरी केली. पॅरालिम्पिक खेळांमध्येही, आपण यंदा सर्वाधिक खेळाडू पाठवले होते. यामध्ये त्यांनी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. याचबरोबर आपल्या खेळाडूंनी FIDE बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये त्यांच्या कामगिरीने जागला प्रभावित करत पुरुष आणि महिला प्रकारात सुवर्णपदके जिंकली. तसेच २०२४ मध्ये, बुद्धिबळपटू डी. गुकेशने सर्वात तरुण विश्वविजेता बनत इतिहास रचला आहे.”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा