नव्या संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्रिमंडळासह आणि सर्वपक्षीय खासदारांसह मंगळवारी प्रवेश केला. त्याआधी त्यांनी जुन्या संसदेत भाषणही केलं. तसंच नव्या संसदेत म्हणजेच सेंट्रल व्हिस्टामध्ये नरेंद्र मोदी आणि सगळे खासदार जेव्हा गेले त्याचवेळी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आलं. त्यावर विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. अशातच हाच का तुमचा सनातन धर्म? असा प्रश्न विचारत उदयनिधी स्टॅलिन यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल केला आहे.

काय म्हटलं आहे उदयनिधी स्टॅलिन यांनी?

“संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन झालं. भाजपाने तामिळनाडूतून अधीनम बोलवले होते. त्यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. मात्र भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आलं नाही. कारण त्या विधवा आहेत आणि आदिवासी जमातीच्या आहेत. हाच का तुमचा सनातन धर्म? आम्ही या विरोधात आमचा आवाज उठवत राहू.” असं म्हणत तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी भाजपावर आणि मोदीसरकारवर टीका केली आहे. आज उदयनिधी स्टॅलिन हे मदुराईतल्या एका कार्यक्रमात गेले होते. तिथे त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Swami Govinddev Giri on Vote Jihad
‘निवडणुकीची तुलना धर्म युद्धाशी नको’, व्होट जिहादच्या मुद्द्यावर स्वामी गोविंददेव गिरींनी व्यक्त केलं परखड मत
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
devendra fadnavis remark on vote jihad in mumbai
‘व्होट जिहाद’विरोधात ‘मतांचे धर्मयुद्ध’ पुकारावे ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
Riteish Deshmukh Speech
Riteish Deshmukh Speech: धर्माचं राजकारण करणाऱ्या पक्षावर रितेश देशमुखची ‘लय भारी’ टीका; म्हणाला, ‘सरकार येणार तर महाविकास आघाडीचेच’
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”

उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावरुन काही दिवसांपूर्वीही भाजपावर टीका केली होती. त्यावरुन चांगलाच वाद निर्माण झाला होता. आता त्यांनी राष्ट्रपती विधवा आहेत म्हणून त्यांना बोलवलं नाही असा आरोप केला आहे आणि हाच का तुमचा सनातन धर्म आहे का? असा प्रश्न विचारला आहे. त्यावरुन पुन्हा नवा वाद होण्याची चिन्हं आहेत.

१६ सप्टेंबरला काय म्हणाले होते उदयनिधी स्टॅलिन?

“सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. त्याचा विरोध करता येत नाही, त्यामुळे तो संपवायला हवा. आपण डेंग्यू, मलेरिया किंवा करोनाचा विरोध करू शकत नाही. त्याला संपवलंच पाहिजे. त्याचप्रमाणे, सनातन धर्मालाही संपवायचं आहे.”