राष्ट्रपती प्रणब मुखर्जी बुधवारी सहा दिवसांच्या बेल्जियम आणि तुर्कस्तान दौऱ्यावर रवाना झाले. राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतरचा मुखर्जी यांचा हा पहिलाच युरोप दौरा असून या दरम्यान शैक्षणिक क्षेत्रावर प्रकाशझोत टाकला जाणार आहे.
राष्ट्रपतींसमवेत मंत्री, ज्येष्ठ अधिकारी, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी असे उच्चस्तरीय शिष्टमंडळही दौऱ्यावर रवाना झाले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष वेद प्रकाश, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू दिनेश सिंग, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू सुधीरकुमार सोपोरी आणि हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू रामकृष्ण रामास्वामी यांचाही शिष्टमंडळात समावेश आहे. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी राष्ट्रपती भवनात मुखर्जी यांना निरोप दिला.

Story img Loader