‘रुपे’ या नावाची भारताची स्वत:ची कार्ड देय प्रणाली (कार्ड पेमेंट नेटवर्क) गुरुवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण करण्यात येणार आहे. राष्ट्रपती भवन येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात ही प्रणाली राष्ट्राला समर्पित करण्यात येणार असल्याचे राष्ट्रपती भवनच्या सूत्रांनी सांगितले. या प्रणालीमुळे भारताची बँकिंग क्षमता जगभरात अधोरेखित होणार आहे.
भारतातील एक लाख ६० हजारांपेक्षा अधिक ‘एटीएम’मध्ये या कार्डाचा उपयोग होणार आहे. देशातील ९.४५ लाखांपेक्षा अधिक पीओएस टर्मिनल आणि अधिकाधिक ई-कॉमर्स टर्मिनलवरही या कार्डाचा वापर करता येईल.
याच कार्डाचे एक वेगळे स्वरूप म्हणजे ‘किसान कार्ड’ असेल. हे कार्ड सर्वच सरकारी बँकांमध्ये चालू शकेल. ४३ बँकांमध्ये डेबिट कार्ड म्हणूनही या कार्डाचा उपयोग होऊ शकतो. आयआरसीटीसी लवकरच ‘प्रीपेड रुपे’ कार्ड जारी करणार आहे.
कार्डचे वितरण
सध्या देशातील १५० सहकारी आणि प्रादेशिक ग्रामीण बँक ‘रुपे एटीएम कार्ड’ वितरित करणार आहे. एक कोटी ७० लाख ‘रुपे कार्ड’ सध्या वितरित करण्यात आले असून, प्रत्येक महिन्यात किमान ३० लाख कार्ड वितरित करण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा