पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना लष्कराच्या रुग्णालयात शनिवारी दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना एक दिवसासाठी रुग्णालयात दाखल करून घेतले. राष्ट्रपतींच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून असून काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे राष्ट्रपतींचे माध्यम सचिव वेणू राजामोनी यांनी सांगितले.  राष्ट्रपतींनी ११ डिसेंबर रोजी ७९व्या वर्षांत पदार्पण केले आहे.

Story img Loader