केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी आपण एका अशा भारताची कल्पना करत आहोत जिथे राष्ट्रपती, पंतप्रधान हातात वेद घेऊन शपथ घेतील असं म्हटलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी अमेरिकेचं उदाहरण दिलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष शपथ घेतात तेव्हा हातात बायबल असते असं त्यांनी यावेळी सांगितलं. देशाची प्रतिष्ठा पुन्हा मिळवायची असेल तर आपल्याला पुन्हा वेदांकडे वळलं पाहिजे असंही ते बोलले आहेत.

‘जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपल्या पदाची शपथ घेतात तेव्हा त्यांच्या हातात बायबल असते आणि ते त्याची शपथ घेतात. मी स्वप्न पाहत आहे जेव्हा या देशातील राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री हातात वेद घेऊन आपल्या पदाची शपथ घेतील’, असं सत्यपाल सिंह बोलले आहेत.

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, ‘जितके गुन्हे, दहशतवादी आणि समस्या आहेत त्यांचं निदान कोणी करु शकतं तर ते फक्त वेदांचे विचार, ज्ञानचं करु शकतं. जर या देशाची प्रतिष्ठा पुन्हा परत मिळवायची असेल तर आपल्याला पुन्हा वेदांकडे जावं लागेल’.

Story img Loader