पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सुरक्षा जवानांना तसेच नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. भारतीयांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाशी लढण्यासाठी पुनश्च दृढ संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. २६ नोव्हेंबर २००८ रोजी, पाकिस्तानातील दहा ‘लष्कर-ए-तैयबा’च्या दहशतवाद्यांनी सागरी मार्गाने मुंबईत घुसून हल्ला केला होता. या हल्ल्यात १८ सुरक्षा कर्मचाऱ्यांसह १६६ नागरिक मृत्युमुखी पडले होते. अनेक जण जखमी झाले.

मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील सर्व पीडितांच्या स्मृतींना राष्ट्र उजाळा देत आहे. शूर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आम्ही त्यांच्या कुटुंबीय आणि प्रियजनांसोबत कायम आहोत. मातृभूमीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सुरक्षा दलाच्या शूर जवानांना मी श्रद्धांजली अर्पण करते. त्यांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करून, सर्वत्र सर्व प्रकारच्या दहशतवादाशी लढण्याची आपली प्रतिज्ञा पुन्हा करूया, असे मुर्मू यांनी ‘एक्स’वर नमूद केले आहे.