बीजिंग : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचा उल्लेख हुकूमशहा म्हणून करणे हे अतिशय ‘हास्यास्पद आणि बेजबाबदारपणाचे’ आहे अशी संतप्त प्रतिक्रिया चीनने व्यक्त केली आहे. या शाब्दिक चकमकीनंतर चीन आणि अमेरिकेदरम्यानचा तणाव कमी होण्याच्या शक्यतेला पुन्हा तडा गेला आहे.

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये एका कार्यक्रमात बोलताना अध्यक्ष बायडेन यांनी क्षी आणि चीन या दोहोंबद्दल काही टिप्पणी केली होती. बायडेन म्हणाले की, ‘हेरगिरी करणाऱ्या बलून प्रकरणाने उद्भवलेल्या तणावामुळे क्षी ओशाळवाणे झाले होते. काय घडले हे कळत नाही तेव्हा ती हुकूमशहांसाठी लाजिरवाणी बाब असते’. ही टिप्पणी तथ्यहीन आहे आणि राजनैतिक शिष्टाचारांचे गंभीर उल्लंघन करते तसेच चीनच्या राजकीय प्रतिष्ठेची हानी करते अशा शब्दांमध्ये चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच बायडेन यांनी उल्लेख केलेले बलून हे केवळ संशोधनाच्या हेतूने सोडण्यात आले होते याआधीच्या दाव्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकेन हे याच आठवडय़ात चीनच्या दौऱ्यावर गेले होते. त्या वेळी त्यांनी अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासह अनेक महत्त्वाच्या राजनैतिक अधिकारी आणि नेत्यांशी चर्चा केली होती. 

Strained US China Relations news in marathi
चीन अमेरिका संबंध आणखी बिघडणार?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Maharashtra Deputy CM Ajit Pawar Dissolves NCP Beed Unit
राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; मंत्री धनंजय मुंडे यांना धक्का
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा?”, सुरेश धस यांचं विधान, रोख कुणाकडे? परळी पॅटर्नचा उल्लेख करत म्हणाले…
US China Relations , US China, Xi Jinping ,
चीनवर अमेरिकी निर्बंधांचा राजकीय परिणामही दिसेल…
Meta x gets rid of fact checkers
अग्रलेख : फेकुचंदांचा फाल्गुनोत्सव!
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
China is aggressive again after Taiwans war drills What are chances of war
तैवानच्या युद्धसरावाने चीन पुन्हा आक्रमक? युद्धाची शक्यता किती?
Story img Loader