राष्ट्रपती पदाची निवडणूक अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपली आहे. पुढील सोमवारी म्हणजेच १८ जुलै २०२२ रोजी ही निवडणूक होणार आहे. विरोधी पक्षांच्या संयुक्त आघाडीने यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. त्याचवेळी भाजपाप्रणित आघाडीने द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवारी दिली आहे. दोन्ही बाजूने आपआपल्या उमेदवारांना जिंकून देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र या दोघांचीही उमेदवारी निश्चित होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं नाव संयुक्त विरोधी पक्षांकडून आघाडीवर होतं. शरद पवार हे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार व्हावेत अशी इच्छा अगदी ममता बॅनर्जींपासून ते काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनीही बोलून दाखवली होती. मात्र शरद पवार यांनी उमेदवारी स्वीकारण्यास नकार दिला. सर्वच विरोधी पक्षांचा आग्रह असतानाच पवार यांनी ही उमेदवारी का नाकारली याबद्दल रविवारी मोठा खुलासा केला.

नक्की वाचा >> २०० आमदार निवडून आणण्याच्या मुख्यमंत्री शिंदेंच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, “मला वाटतं त्यांचं चुकलं काहीतरी, आपली…”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील सत्तांतरनाट्य, देशातील विरोधकांची भूमिका, श्रीलंकेतील अराजक आणि न्यायप्रक्रियेबाबत कायदे अभ्यासकांकडून होत असलेली चिंता व्यक्त करतानाच औरंगाबादमध्ये पत्रकारांसोबत केलेल्या वार्तालापमध्ये शरद पवार यांनी भाजपा वगळता सर्व पक्षांकडून आपल्याला राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उभं राहण्याचा आग्रह करण्यात आलेला असं सांगितलं. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आग्रह होऊनही आपण यासाठी का नकार दिला याबद्दल पवार यांनी अगदी मोकळेपणे पत्रकारांना मत मांडलं.

नक्की वाचा >> फडणवीसांच्या नागपूरमधील बॅनर्सवरुन अमित शाहांचे फोटो गायब; शरद पवारांना विचारलं असता म्हणाले, “त्याच्यात कोणाचा फोटो…”

“भाजपा सोडून देशातील सर्व राजकीय पक्षांनी मला राष्ट्रपतीपदासाठी आग्रह केला होता. पण माझे व्यक्तिगत मत स्पष्ट होते की ही जबाबदारी किंवा हे काम स्वीकारू नये. यात यश येण्याची स्थिती नव्हती,” असं शरद पवार म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी, “यदाकदाचित यश आले असते तर माझ्यासारख्या माणसाला अखंड एका ठिकाणी बसणे, कुठेही बाहेर न जाणे, लोकांशी सुसंवाद न ठेवणे या सगळ्या गोष्टी त्रासदायक झाल्या असत्या,” असंही सांगितलं. ” त्यासाठी हा आपला रस्ता नाही हा विचार असल्याने मी नाही म्हणून सांगितले,” असं पवार म्हणाले.

नक्की वाचा >> अजित पवारांचं बंड मोडण्यात तुम्हाला यश आलेलं मग उद्धव ठाकरे बंड का मोडू शकले नाहीत?; शरद पवार म्हणाले, “आमच्यात काही…”

नक्की वाचा >> …म्हणून तेव्हा महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेंचं नाव निश्चित केलं; शरद पवारांचा खुलासा

यावेळी पवार यांनी न्यायव्यवस्थेसंदर्भातही भाष्य केलं. “न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. न्यायालयाच्या काही गोष्टींचे निकाल चिंताजनक आहेत असे काही लोकांचे मत आहे. निष्णांत वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालय ज्या पद्धतीने निर्णय घेते त्यातून आम्हाला धक्का बसतो, असे मत मांडले. न्यायालयीन क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये अस्वस्थता दिसते,” असं पवार म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Presidential election 2022 candidates sharad pawar gives reason why he rejected to be a candidate scsg