Presidential Election Result Live, 21 July 2022 : भारताच्या राष्ट्रपती पदासाठी सोमवारी झालेल्या मतदानानंतर आज त्याची मतमोजणी करण्यात येणार आहे. अवघ्या देशाचं लक्ष या मतमोजणीकडे लागलं आहे. आज देशाला नवे राष्ट्रपती मिळणार असून बहुमताच्या जोरावर द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे. दरम्यानच्या काळात विरोधी पक्षांकडून उमेदवारी देण्यात आलेले यशवंत सिन्हा यांनी लोकशाही व्यवस्था वाचवण्यासाठी मतदान करण्यासंदर्भात आवाहन देखील केलं होतं. त्यामुळे आता नेमकी मतमोजणी झाल्यानंतर निकाल काय लागणार? याकडे लक्ष लागलं आहे.
Presidential Election 2022 Result Live : द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा? भारताला मिळणार नवीन राष्ट्रपती
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीच्या मतमोजणीमधील पहिला टप्पा पूर्ण झाला असून खासदारांच्या मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. या मतमोजणीमध्ये द्रौपदी मुर्मू आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे.
मतपेट्या उघडून पहिल्या टप्प्यात खासदारांच्या मतांची मोजणी...
मतमोजणी सुरू झाल्यानंतरची काही छायाचित्रे...
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाल्यास तो साजरा करण्यासाठी ओडीसामधील त्यांचं गाव असलेल्या रायरंगपूरमध्ये तब्बल २० हजार लाडू तयार करण्यात येत आहेत.
आधी आमदार-खासदारांच्या मतांची मोजणी होणार. त्यानंतर राज्यांमधील आमदारांच्या मतांची मोजणी केली जाईल. १० राज्यांच्या गटांमध्ये सर्व राज्यांमधील आमदारांच्या मतांची मोजणी केली जाईल. प्रत्येक टप्प्यावर निवडणूक अधिकारी माध्यमांना माहिती देतील.
द्रौपदी मुर्मू यांच्या रायरंगपूरमधील घरी उत्साहाचं वातावरण. मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
जर द्रौपदी मुर्मू निवडणूक जिंकल्या, तर त्या भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरतील.
राष्ट्रपतीपदासाठीच्या मतमोजणीला सुरुवात...
सोनिया गांधींच्या ईडी चौकशीवरून आपनं केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराचा आरोप करत राज्यसभेत शून्य प्रहर प्रस्ताव मांडला.
सोनिया गांधींची आज ईडीकडून चौकशी केली जाणार असून त्यासंदर्भात विरोधकांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी टीका करणारं ट्वीट केलं आहे.
https://twitter.com/YashwantSinha/status/1549984607323377665
राष्ट्रपतीपदाच्या निवडीसाठी ११ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
राष्ट्रपतीपदासाठी देशभरातील राज्यांच्या विधानसभांमध्येही मतदान पार पडले. छत्तीसगड, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, मिझोराम, सिक्कीम आणि तामिळनाडू या दहा राज्यांमध्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात १०० टक्के मतदान झाले.
द्रौपदी मुर्मू चांगल्या मतांनी जिंकतील. एक आदिवासी महिला राष्ट्रपतीपदावर विराजमान होणं ही आमच्या सगळ्यांसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.
देशाचे १६ वे राष्ट्रपती निवडण्यासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीमध्ये ९९ टक्के लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात १०० टक्के मतदान पार पडले. राष्ट्रपती पदासाठी ७७१ खासदार आणि ४०२५ आमदारांसह ४७९६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला. त्यामुळे आज या निवडणुकीचा निकाल काय लागतो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे.