Presidential Poll Updates, 18 July 2022: देशाच्या १६व्या राष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक होणार आहे. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे संयुक्त उमेदवार माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यात सरळ लढत होईल. द्रौपदी मुर्मू यांना ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाची औपचारिकता उरली आहे. देशाच्या दुसऱ्या महिला आणि आदिवासी समाजाच्या पहिल्या नेत्या येत्या २५ जुलै रोजी सर्वोच्च पदावर विराजमान होतील असा विश्वास सत्ताधारी पक्षाला आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ४८०९ लोकप्रतिनिधींना मतदानाचा अधिकार असेल. लोकसभेचे ५४३ खासदार, राज्यसभेचे २३३ खासदार आणि ४०३३ विविध राज्यांमधील आमदारांमधून नव्या राष्ट्रपतींची निवड होईल.
एकूण ४८०९ लोकप्रतिनिधींचे मतांचे मूल्य हे १० लाख, ८६ हजार, ४३१ एवढे आहे. लोकसभा आणि राज्यसभेतील ७७६ खासदारांच्या प्रत्येक मताचे मूल्य हे ७०० एवढे असेल. खासदारांच्या एकूण मतांचे मूल्य हे ५ लाख, ४३ हजार, २०० आहे. विविध राज्यांमधील आमदारांच्या एकूण मतांचे मूल्य हे ५ लाख, ४३ हजार, २३१ एवढे आहे.
Presidential Election Live updates: द्रौपदी मुर्मू यांना ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाची औपचारिकता उरली आहे
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी हैदराबादमध्ये मतदान केलं आहे.
Telangana CM K Chandrashekhar Rao casts his vote for #PresidentialElections in Hyderabad pic.twitter.com/uN5apC91to
— ANI (@ANI) July 18, 2022
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
Delhi | Union Minister & BJP MP Dharmendra Pradhan casts his vote in the Parliament for the Presidential polls pic.twitter.com/kZ3fW7Bl7M
— ANI (@ANI) July 18, 2022
काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला आहे.
राष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक होत असून, यासाठी मतदान सुरू आहे. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे संयुक्त उमेदवार माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यात थेट लढत दिसत आहे. या निवडणुकीबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी आज पुण्यात माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
वाचा सविस्तर बातमी…
हरियाणामधील काँग्रेसचे आमदार कुलदीप बिष्णोई यांनी राष्ट्रपती निवडणुकीत आपल्या सद्सदविवेकबुद्धीनुसार मतदान केलं असल्याचं सांगितलं आहे. महत्वाचं म्हणजे कुलदीप बिष्णोई यांनी राज्यसभेत पक्षादेशाच्या विरोधात मतदान केलं होतं.
एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान केल्याचे संकेत देताना त्यांनी सांगितलं की, “राज्यसभेप्रमाणे यावेळी अंतर्मनाचा आवाज ऐकत मी मतदान केलं आहे”. यापुढील रणनीती काय आहे असं विचारण्यात आलं असता आपण लवकरच जाहीर करु असं ते म्हणाले आहेत.
शिरोमणी अकाली दलाचे आमदार मनप्रीत सिंग अयाली यांनी सोमवारी (१८ जुलै) राष्ट्रपती निवडणुकीवर बहिष्कार घातला. पंजाबचे प्रलंबित प्रश्न आणि एनडीएच्या उमदेवारांना पाठिंब्याबाबत पक्षाने चर्चा न केल्याचं कारण सांगत त्यांनी हा निर्णय जाहीर केला.
राष्ट्रपती निवडणुकीत मतदानासाठी सोनिया गांधी, शशी थरूर, दिग्विजय सिंह संसदेत दाखल
Delhi | Congress MPs Sonia Gandhi, Shashi Tharoor and Digvijaya Singh arrive in Parliament to cast their votes for Presidential elections pic.twitter.com/ZGiK1TKOE6
— ANI (@ANI) July 18, 2022
बिहारमध्ये भाजपा आमदार मिथिलेश कुमार मतदान केल्यानंतर स्ट्रेचरवरुन रवाना झाले.
PTI
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी द्रौपरी मुर्मू यांच्या विजयाची खात्री व्यक्त केली आहे. “२१ जुलैला द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूनेच निकाल लागेल असा विश्वास आहे. २५ जुलैला आम्ही शपथविधीला हजेरी लावू. हरियाणातून अपेक्षेपेक्षा जास्त मतं मिळतील”.
गुजरातमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार कांधल जडेजा यांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान केल्याची माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दर्शवला आहे.
Gujarat | NCP MLA Kandhal S Jadeja says he has voted for NDA's presidential candidate Droupadi Murmu pic.twitter.com/dorgGuOQqT
— ANI (@ANI) July 18, 2022
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासंबंधी घेतलेल्या निर्णयाबद्दल बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की, “राष्ट्रपती निवडणूक ही इतर कोणत्याही निवडणुकीपेक्षा वेगळी असते असं आमचं मत आहे. हे सर्वोच्च पद असून योग्य उमेदवारालाच मत दिलं पाहिजे. त्यामुळेच आम्ही हा निर्णय़ घेतला”.
उपराष्ट्रपतीपदाचे ‘रालोआ’चे उमेदवार म्हणून पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीश धनखड यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित होते.
#WATCH | Delhi: NDA candidate Jagdeep Dhankhar files his nomination for the Vice Presidential elections in the presence of PM Narendra Modi.
— ANI (@ANI) July 18, 2022
(Source: DD) pic.twitter.com/jyUOddtxOe
देशातील प्रत्येक निवडणूक सणांप्रमाणे साजरी केली पाहिजे असं आवाहन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलं आहे.
राष्ट्रपति चुनाव लोकतंत्र का उत्सव। सभी सदस्य इस उत्सव में हों सम्मिलित : @loksabhaspeaker Shri @ombirlakota pic.twitter.com/xTDfJfMX2u
— LOK SABHA (@LokSabhaSectt) July 18, 2022
“देशात अराजकता आहे, लोकशाहीला धोका आहे. सर्रासपणे घटनात्मक संस्थांचा गैरवापर होत आहे. यामध्ये लक्ष घालतील असे राष्ट्रपती आम्हाला हवे आहेत. आपले पंतप्रधान तर तरुण आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चादेखील करत नाहीत,” अशी टीका राष्ट्रीय जनता दलाचे आमदार तेजस्वी यादव यांनी केली आहे.
“आम्हाला राष्ट्रपती म्हणून मूर्ती नको आहे. एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बोलल्याचं कोणी ऐकलंय का? त्यांनी कधी पत्रकार परिषद घेतली आहे का? दुसरीकडे विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी अनेक पत्रकार परिषदा घेतल्या आहेत,” असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी एएनआयशी बोलताना आपण विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना मतदान केल्याची माहिती दिली. “देशात कोणीतरी हवं जे सरकारला वारंवार अर्थव्यवस्थेची स्थिती काय आहे हे सांगेल. आज श्रीलंकेची स्थिती पहा. त्यामुळे वेळोवेळी हे सरकारला सांगणारे राष्ट्रपती हवेत,” असं ते म्हणाले आहेत.
I'll vote in the favor of Yashwant Sinha. There should be someone in the country who can tell the Govt the situation of the economy, from time to time. Look at Sri Lanka's condition. So, there should be President who can say that from time to time: SP chief & MLA Akhilesh Yadav pic.twitter.com/IVm8ueIpdq
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) July 18, 2022
केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पियूष गोयल यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपा खासदार हेमा मालिनी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
BJP MP Hema Malini casts her vote to elect the new President of India, at the Parliament. pic.twitter.com/QSIcZhBkYz
— ANI (@ANI) July 18, 2022
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग मतदानाचा हक्क बजावण्यासाठी संसदेत पोहोचले. प्रकृती ठीक नसल्याने मनमोहन सिंग व्हीलचेअरवरुन पोहोचले.
Former Prime Minister of India and Congress MP Manmohan Singh, after casting his vote in the election being held for the post of President of India in Parliament pic.twitter.com/pm4Bihza1Z
— ANI (@ANI) July 18, 2022
देशाच्या राष्ट्रपतींचा शपथविधी २५ जुलैला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. राष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा यापूर्वीही अनेकदा याच तारखेला झाला आहे. राष्ट्रपती २५ जुलैलाच शपथ घेतात, ही परंपरा भारतात अनेक वर्षांपासून सुरू आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan casts his vote for the Presidential election, at the State Assembly in Bhopal. pic.twitter.com/ssobmZ1ocm
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) July 18, 2022
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ६४ वर्षीय द्रौपदी मुर्मू यांना सत्तारूढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीने उमेदवारी दिली. त्यांचा सामना माजी केंद्रीय अर्थमंत्री ८४ वर्षीय यशवंत सिन्हा यांच्याशी आहे. ते विरोधकांचे संयुक्त उमेदवार आहेत. अर्थात संख्याबळ पाहता मुर्मू यांचा विजय औपचारिकताच आहे. तसे झाल्यास त्या देशातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरतील.
भाजपा, शिवसेना, शिवसेनेतील शिंदे गट, अपक्ष व छोटय़ा पक्षांच्या पाठिंब्यामुळे भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना आमदारांची २८७ पैकी १८०पेक्षा अधिक मते मिळतील, अशी शक्यता आहे. संसदेच्या उभय सभागृहातील ६७ खासदारांपैकी भाजपा, शिवसेना आणि अपक्ष खासदारांचे संख्याबळ ५४ आहे. खासदार आणि आमदारांचे एकूण संख्याबळ लक्षात घेतल्यास राज्यातून भाजपच्या मुर्मू यांना ७० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळू शकतात. काँग्रेस व राष्ट्रवादीमधील आदिवासी समाजाच्या आमदारांना भाजपने मतदानाचे आवाहन केले आहे. या निवडणुकीत भाजपच्या मुर्मू यांना २००च्या आसपास आमदारांचा पाठिंबा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीत भाजपच्या मुर्मू यांना २००च्या आसपास आमदारांचा पाठिंबा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
Mumbai | Maharashtra CM Eknath Shinde votes in the 16th Presidential election pic.twitter.com/0YFeVTA3wD
— ANI (@ANI) July 18, 2022
अनुसूचित जमातीमधील आमची बहिण राष्ट्रपती निवडणुकीत उभी आहे. पक्षाच्या नेत्यांचा आदेश ऐकण्याऐवजी अशा निवडणुकीत अंतर्मनाचा आवाज ऐकावा. २०० पेक्षा जास्त आमदारांचं अंतर्मन आदिवासी भगिणीला मतदान करण्यासाठी प्रवृत्त करेल असा विश्वास आहे असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.
अनेक राज्यांमध्ये काँग्रेसचेही आमदार बसमधून आणले जात आहेत. नाना पटोलेंसाठी टीका करणं हाच मोठा कार्यक्रम आहे असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे.
काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्या मतदानावर भाजपा नेते बबनराव लोणीकर यांनी आक्षेप घेतला आहे. नितीन राऊत यांनी रांगेत मतदान न करता आपल्याआधी मतदानाचा हक्क बजावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याविरोधात आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. नितीन राऊत यांचं मत बाद केलं जावं अशी त्यांची मागणी आहे.
“नितीन राऊत यांच्या विरोधात मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. त्यांचं मत बाद करावं, ते अर्धा तास आधी मतदान करणाऱ्या सभागृहात कसे गेले? हा आमचा सवाल आहे. नियमाप्रमाणे माझं पहिला नंबर होता, मात्र त्यांनी आधी मतदान केलं हे सगळं रेकॉर्ड झालं आहे,” असं लोणीकर म्हणाले आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
#WATCH Uttar Pradesh CM Yogi Adityanath casts vote to elect new President, in Lucknow#PresidentialElection pic.twitter.com/VDJ4WZIPp7

मणिपूरमध्ये राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान सुरु झालं आहे. विधानसभा सचिवालयात मतदान केलं जात आहे.
Voting to elect the next President of India is underway in Manipur Assembly Secretariat, Imphal. pic.twitter.com/4nm5XQusng
— ANI (@ANI) July 18, 2022
गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
Gujarat CM Bhupendra Patel casts his vote in Gandhinagar in the election being held for the post of President of India pic.twitter.com/MgEqbNeTWY
— ANI (@ANI) July 18, 2022
मतदानाला सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. याआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत असल्याने विशेष महत्व आहे. याच कालखंडात देशाला नवे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती मिळणार असून त्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे असं सांगितलं आहे.
Delhi | Prime Minister Narendra Modi casts his vote in the 16th Presidential election, at the Parliament. pic.twitter.com/XMKXUWDfvL
— ANI (@ANI) July 18, 2022
जवळपास ४८०० आमदार आणि खासदार सोमवारी राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान करतील. सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत संसदेत आणि विधानसभांमध्ये मतदान पार पडणार आहे. २१ जुलैला मतमोजणी होणार असून २५ जुलैला नवे राष्ट्रपती शपथ घेतील.
उपराष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा यांच्या उमेदवारीची घोषणा विरोधकांनी रविवारी केली. उपराष्ट्रपतीपदाचे ‘रालोआ’चे उमेदवार म्हणून पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीश धनखड यांच्या नावाची भाजपने शनिवारी घोषणा केली होती. त्यामुळे ६ ऑगस्टला होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत धनखड आणि अल्वा यांच्यात लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले.