अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयावर सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शिक्कामोर्तब केले. राष्ट्रपतींनी केजरीवाल यांचा राजीनामा स्वीकारला असून, राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे दिल्ली विधानसभा निलंबनावस्थेत राहणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात यासंदर्भात स्वतःहून निवेदन केले. राजकीय अनिश्चिततेने झाकोळलेल्या दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने शनिवारी घेतला. जनलोकपाल विधेयक मांडता न आल्यावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी राजीनामा दिल्याने काँग्रेसच्या पाठिंब्यावर स्थापन झालेले आम आदमी पक्षाचे औटघटकेचे सरकार मोडीत निघाले होते. विधानसभा बरखास्त करून तातडीने निवडणुका घ्याव्यात, ही केजरीवाल सरकारची अखेरची मागणीही नायब राज्यपाल नजीब जंग यांनी धुडकावली आणि विधानसभा निलंबनावस्थेत ठेवून दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्राला केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा