आंध्र प्रदेशात राष्ट्रपती राजवट जारी करून सत्तारूढ काँग्रेसने आपली राजकीय दिवाळखोरी दाखवून दिली आहे आणि ही कृती सर्व निकषांची पायमल्ली करणारी आहे, अशी टीका तेलगु देशम पार्टीने केली आहे.
आंध्र प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करणे म्हणजे लोकशाहीची थट्टा आहे. तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) आणि वायएसआर काँग्रेसशी संधान बांधून सरकार स्थापन करण्याचा काँग्रेस आटापिटा करीत आहे, असे चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे. तथापि, काँग्रेसच्या बहुसंख्य आमदारांनी त्यामधील दोष दर्शवून अशा प्रकारे स्थापन होणाऱ्या सरकारला विरोध करण्याचे ठरविल्याने काँग्रेसला आंध्र प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करणे भाग पडले, असे नायडू यांनी म्हटले आहे.
काँग्रेसची राजकीय दिवाळखोरी – नायडू
आंध्र प्रदेशात राष्ट्रपती राजवट जारी करून सत्तारूढ काँग्रेसने आपली राजकीय दिवाळखोरी दाखवून दिली आहे आणि ही कृती सर्व निकषांची पायमल्ली करणारी आहे
First published on: 02-03-2014 at 04:39 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Presidents rule in andhra pradesh mockery of democracy chandrababu naidu