आंध्र प्रदेशात राष्ट्रपती राजवट जारी करून सत्तारूढ काँग्रेसने आपली राजकीय दिवाळखोरी दाखवून दिली आहे आणि ही कृती सर्व निकषांची पायमल्ली करणारी आहे, अशी टीका तेलगु देशम पार्टीने केली आहे.
आंध्र प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करणे म्हणजे लोकशाहीची थट्टा आहे. तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) आणि वायएसआर काँग्रेसशी संधान बांधून सरकार स्थापन करण्याचा काँग्रेस आटापिटा करीत आहे, असे चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे. तथापि, काँग्रेसच्या बहुसंख्य आमदारांनी त्यामधील दोष दर्शवून अशा प्रकारे स्थापन होणाऱ्या सरकारला विरोध करण्याचे ठरविल्याने काँग्रेसला आंध्र प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करणे भाग पडले, असे नायडू यांनी म्हटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in