Jammu Kashmir President Rule Revoked : जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात आली आहे. केंद्र सरकारने रविवारी अधिसूचना जारी करून हा निर्णय घेतला. केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये लवकरच नवं सरकार स्थापन होणार आहे, त्यापार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, “जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा, २०१९ च्या कलम ७३ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून भारतीय राज्यघटनेच्या कलम २३९ आणि २३९ए अंतर्गत जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित ३१ ऑक्टोबर, २०१९ रोजीचा आदेश जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा, २०१९ च्या कलम ५४ अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीपूर्वी ताबडतोब मागे घेण्यात येईल.”

maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Manifesto Mira Bhayander, Mira Bhayander,
मिरा भाईंदरसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा; रेल्वे टर्मिनस, दिवाणी न्यायालयाची घोषणा
Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadik : धनंजय महाडिक आगीतून फुफाट्यात? महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरून माफी मागताना नवं वक्तव्य, म्हणाले…
Prime Minister Narendra Modi and Union Home Minister Amit Shah in the state of Maharashtra to campaign for the assembly elections
नरेंद्र मोदी, अमित शहा आजपासून राज्यात; पंतप्रधानांच्या महाराष्ट्रात १० सभा
Narendra Modi, Uddhav Thackeray, Solapur
सोलापुरात मोदी, उद्धव ठाकरेंच्या एकाच दिवशी प्रचारसभा
Uran Assembly, Shekap, Pritam Mhatre,
शेकाप नेत्यांच्या आदेशानेच निवडणूक रिंगणात, उरण विधानसभा मतदारसंघातील शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांचे स्पष्टीकरण
uttar pradesh leaders in pune for candidates campaigning maharashtra assembly election 2024
विधानसभेसाठी उत्तरप्रदेश मधील नेतेही मैदानात ! पुण्यातील येरवडा भागात १७ नोव्हेंबरला होणार सभा

हेही वाचा >> Video: DJ लावण्यावरून उत्तर प्रदेशात दोन समाजांमध्ये हिंसाचार; पोलिसांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू, आक्रमक जमावानं घरं पेटवली!

सहा वर्षांनी हटली राष्ट्रपती राजवट

 २० जून २०१८ रोजी पीडपी सरकारकडे बहुमत नसल्यामुळे व अन्य कोणत्याही पक्षाने सरकार स्थापनेचा दावा न केल्यामुळे या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. तर २१ नोव्हेंबर २०१८ रोजी येथील विधानसभा भंग करण्यात आली होती.  ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा समंत केल गेला. तसंच, राज्याला विशेष दर्जा देणारे संविधानेच कलम ३७० देखील रद्द करण्यात आळे. त्यानंतर ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये औपचारिक विभाजन झाले. सुरुवातीला येथे सहा महिन्यांचीच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. परंतु, कालांतराने सहा वर्षांपर्यंत ही राष्ट्रपती राजवट येथे राहिली. अखेर कलम ३७० रद्द केल्याच्या सहा वर्षांनी येथे विधानसभेच्या निवडणुका झाल्या असून निकालही हाती आले आहेत. आता लवकरच ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्त्वाखालील नॅशनल कॉन्फरन्स पक्ष येथे सत्ता स्थापन करणार आहे.

जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट हटवण्याकरता नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी केंद्र सरकारला विनंती केली होती. त्यानुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजलट हटवली. यामुळे येथील मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाला आहे. नव्या सरकारच्या स्थापनेसाठी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओबर अब्दुल्ला यांना लवकरच निमंत्रण देण्याची शक्यता आहे.

जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सने सरकार स्थापनेचा दावा केला आहे. ओमर अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे आता राष्ट्रपती राजवटही संपुष्टात आणल्याने ओमर अब्दुल्ला केव्हाही मुख्यमंत्री पदाच्या गादीवर बसू शकतील.