गुरुत्वाकर्षण विज्ञानात चार दशकांपासून कार्यरत भारतीय वंशाचे अमेरिकन शास्त्रज्ञ प्रा. अभय अष्टेकर यांना प्रतिष्ठेचा आइन्स्टाइन पुरस्कार जाहीर झाला आहे. अमेरिकन फिजिकल सोसायटीने ही घोषणा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमेरिकन फिजिकल सोसायटीद्वारे अष्टेकर यांना १० हजार डॉलर पुरस्कार स्वरूपात देण्यात येणार आहे. महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराची सुरुवात १९९९ मध्ये झाली होती.

पेन्सेल्व्हिनिया स्टेट यूनिवर्सिटीच्या इन्स्टिट्यूट फॉर ग्रॅव्हिटेशन अँड द कॉसमासचे निर्देशक असलेले अभय अष्टेकर यांना हा पुरस्कार सामान्य सापेक्षता, ब्लॅक होल सिद्धांत आणि क्वांटम फिजिक्समधील योगदानाबद्दल देण्यात येत आहे.

शाळेत असताना मी न्यूटनचा सिद्धांत आणि गुरुत्वाकर्षणाची माहिती जाणून घेतली. ज्या बलामुळे कोणतेही साहित्य पृथ्वीवर येते. त्याच बलामुळे पृथ्वी सुर्याची परिक्रमा करते, असे अष्टेकर यांनी पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर म्हटले.

अष्टेकर यांचा जन्म ५ जुलै १९४९ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात झाला. त्यांचे बालपण आणि शिक्षण मुंबईत झाले. पुढे गुरुत्वाकर्षण विषयातील पदवी त्यांनी टेक्सास विद्यापीठातून प्राप्त केली. त्यांनी अनेक नामांकित विद्यापीठात अध्यापनाचे काम केले आहे. अष्टेकर यांनी १९७४ मध्ये शिकागो विद्यापीठातून पीएच.डी प्राप्त केली. त्यांनी फ्रान्स, कॅनडा आणि भारतात महत्वाच्या पदावर काम केले आहे.

त्यांच्या मते, भौतिक आणि खगोल क्षेत्रात होणाऱ्या शोधांमध्ये अनेक दशकांपर्यंत गुरुत्वाकर्षणाचे प्रभुत्व राहील. भौतिक क्षेत्रात भारतीय वैज्ञानिकांचे काम चांगले असून ते या क्षेत्रात चीनपेक्षाही पुढे असल्याचेही ते म्हणाले.