राष्ट्रपती भवनाच्या परिसरातील नूतनीकृत शॉपिंग कॉम्प्लेक्सचे उदघाटन मंगळवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आल़े.  या कॉप्म्लेक्समध्ये ‘सफल’ विक्री केंद्र, केंद्रीय भंडार आदी आठ दुकानेही आहेत़.
या वेळी उपस्थिती असलेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यासमवेत राष्ट्रपतींनी कॉम्प्लेक्समधील सर्व आठ दुकानांना भेट दिली आणि तेथील कर्मचाऱ्यांशी गप्पा मारल्या़.
येथील दोन दुकाने स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात आहेत़, तर सहा दुकाने टप्प्याटप्प्याने थाटण्यात आलेली आहेत़  त्यापैकी सफल, केंद्रीय भंडार आणि शक्ती हात ही नुकतीच सुरू झालेली दुकाने आहेत़.  ‘शक्ती हात’मध्ये स्वयं साहाय्यता गटांची मसाला, हातांनी बनविलेले लिफाफे आदी उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत़
विशेष म्हणजे या कॉम्प्लेक्समध्ये सौंदर्य प्रसाधनालय आणि केश कर्तनालयही सुरू करण्यात आले आह़े.  या कॉम्प्लेक्सची पुनर्बाधणी राष्ट्रपती भवनातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छाशक्तीमुळे शक्य झाल्याचे या वेळी नमूद करण्यात आल़े.