पुजारी म्हटलं की डोळ्यासमोर निर्व्यसनी आणि देवाच्या भक्तीत तल्लीन झालेला व्यक्ती आठवतो. मात्र, हरियाणातील पंचकुलामध्ये एक असाही पुजारी समोर आलाय ज्याच्यावर अनेक गंभीर आरोप झालेत. या पुजाऱ्यानं पीडित व्यक्तीला आधी दारू आणण्यास सांगितलं. नंतर दारू पिऊन याच व्यक्तीला खोलीत बंद करून मारलं. शेवटी त्याचा मोबाईल फोडून गाडीलाही आग लावल्याचा आरोप पीडित व्यक्तीने केल्या.

पीडित व्यक्तीचं नाव राज कुमार सिंह असं असून ते चंडीगडच्या मनीमाजरा येथील रहिवासी आहेत. त्यांनी चंडीमंदिर पोलीस स्टेशनला या मारहाणीबाबात तक्रार दिली आहे. आपल्या तक्रारीत राजकुमार सिंह यांनी सांगितलं, “गुरुवारी (१४ ऑक्टोबर) ते सायंकाळी ५ वाजता भोलेनाथ मंदिरात केंदूवाले बाबांचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. तेथे मणी नावाचा एका पोलीस अधिकाऱ्याचा मुलगाही होता. तो पुजारी बाबा गुलाब सिंह याच्यासोबत बसलेला होता. त्या दोघांनी मला दारू आणण्यास सांगितलं. त्यानंतर त्यांनी दारू पिऊन मला एका खोलीत बंद केलं आणि मारहाण केली.”

“पुजाऱ्याने मला मारून जवळच्या विहिरीत टाकून देण्याचा सल्ला दिला”

“मारहाण करताना पुजाऱ्यानं माझ्या खांद्यावर स्टीलचा ग्लास फेकून मारला. पुजाऱ्याने मी पोलिसांकडे जाईल पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाला मला मारून जवळच्या विहिरीत टाकून देण्याचा सल्ला दिला. त्यांनी माझा फोन हिसकावून घेतला आणि त्याची मोडतोड केली. दोघांनी माझ्या मोटारसायकलला आग लावली. मी कसाबसा तेथून स्वतःचा जीव वाचवून पळून आलो,” असंही पीडित राजकुमारने आपल्या तक्रारीत नमूद केलंय.

हेही वाचा : मंदिरांच्या मालमत्तेचा एकमेव मालक देवच, बाकी सगळे नोकर : सुप्रीम कोर्ट

या प्रकरणी ‘द इंडियन एक्सप्रेस’सोबत बोलताना तक्रारदारांनी सांगितलं, “मी चंडीगडमधील रिअल इस्टेट मार्केटमध्ये काम करतो. मी मागील ४-५ महिन्यांपासून धार्मिक हेतूने दर १०-१५ दिवसांनी मंदिरात जात होतो. मंदिरातील पुजारी कधी माझ्याकडे जेवण मागायचे तर कधी किराणा सामान मागायचे. मी त्यांना आनंदाने ते द्यायचो. त्यात मी खूप अंधश्रद्धाळू झालो. त्यामुळे पुजाऱ्यांनी मला दारू आणण्यास सांगितलं तरी मी ती आणून दिली. मात्र, ही गोष्ट बाहेर कुणाला समजू नये म्हणून पुजाऱ्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला.”

Story img Loader