मूळचे सोलापूरचे व सध्या चंदीगडचे जिल्हाधिकारी असलेल्या अजित जोशी यांना ‘पंतप्रधान सर्वोत्कृष्ट प्रशासकीय कामगिरी’ पुरस्कार गुरुवारी प्रदान करण्यात आला. जनधन योजनेची सर्वात प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल नरेंद मोदी यांनी जोशी यांचे कौतुक करत त्यांना पुरस्कार प्रदान केला. हरियाणा केडरमध्ये काम करणाऱ्या जोशी यांची आजवरची कारकीर्द अत्यंत प्रभावी ठरली आहे
अजित जोशी हे २००३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून, यूपीएससीच्या परीक्षेत महाराष्टात अव्वल तर देशात २९ वा कमांक मिळवला होता. अजित जोशी यांनी पंतपधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केलेली महत्त्वाकांक्षी जनधन योजना जिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना, अत्यंत पभावीपणे अंमलबजावणी करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला. त्याची नोंद घेऊन भारतीय प्रशासकीय सेवेतील सर्वोच्च ‘प्राईम मिनिस्टर अॅवॉर्ड फॉर अॅडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सलन्स’ या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. प्रभावी प्रसार व प्रचार यंत्रणा राबवून अजित जोशी यांनी निर्धारित वेळेपूर्वीच तब्बल २ लाख २० हजार खाती या योजनेअंतर्गत उघडली. याच योजनेशी अटल पेन्शन योजना व इतर योजनांना जोडून दीड लाखाहूंन अधिक नागरिकांना विमाकवच पुरविले. तसेच खातेदारांच्या मृत्यूनंतर अवघ्या २१ दिवसांमध्ये जनधन योजनेमधून त्या कुटुंबाला इन्शुरन्स मिळवून देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आली. अजित जोशी यांच्या या कामगिरीची दखल घेऊन पंतप्रधान कार्यालयाने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली.