नवी दिल्ली : या वर्षीच्या पहिल्या विदेश दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तीन दिवसांच्या प्रवासात २५  कार्यक्रम असतील. सोमवारपासून हा तीन देशांचा दौरा सुरू होईल. सात देशांच्या ८ जागतिक नेत्यांसोबत पंतप्रधान द्विपक्षीय तसेच बैठका घेतील, तसेच ५० जागतिक उद्योगपतींशीही चर्चा करतील. याशिवाय भारतीय समुदायाच्या हजारो सदस्यांशीही ते संवाद साधतील. युक्रेनमधील संकटाच्या पार्श्वभूमीवर, मोदी हे २ मेपासून जर्मनी, डेन्मार्क व फ्रान्स या देशांचा दौरा करतील.  पंतप्रधान आधी जर्मनीला व नंतर डेन्मार्कला जातील  परतीच्या प्रवासात ४ मे रोजी काही काळासाठी पॅरिसला थांबतील. पॅरिसमध्ये ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी, तर  बलिर्नमध्ये  जर्मनीचे फेडरल चान्सलर ओलाफ शूल्झ यांच्यासोबत द्विपक्षीय बोलणी करतील, असे सूत्रांना सांगितले. 

Story img Loader