पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा राजस्थान विधानसभा निवडणुकीत अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वादाचा संदर्भ उपस्थित करत काँग्रेसमध्ये सचिन पायलट यांच्यावर अन्याय होत असल्याचा दावा केला आहे. राजसमंद येथे गुरुवारी प्रचार सभेत मोदी यांनी काँग्रेस गुर्जरांचा अपमान करत असल्याचा आरोप केला.पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘‘एक गुर्जरपुत्र राजकारणात स्थान निर्माण करण्यासाठी धडपड करतो, त्याचे आयुष्य पक्षाला देतो आणि सत्तेवर आल्यावर राजघराणे (गांधी कुटुंबाचा अप्रत्यक्ष उल्लेख) त्याला दुधातून माशीप्रमाणे बाहेर काढते. त्यांनी राजेश पायलट यांनाही हीच वागणूक दिली होती आणि त्यांच्या मुलालाही तसेच वागवत आहेत.’’

मोदी यांनी बुधवारीदेखील अशाच प्रकारची टीका केली होती. त्यावर ‘‘आपला पक्ष आणि जनता यांच्याशिवाय अन्य कोणीही माझी चिंता करायची गरज नाही’’, अशा शब्दांमध्ये सचिन पायलट यांनी पंतप्रधानांना उत्तर दिले होते. राजेश पायलट हे आयुष्यभर काँग्रेस कार्यकर्ते होते आणि पंतप्रधानांच्या विधानामध्ये सत्याचा अजिबात अंश नाही असे प्रत्युत्तर सचिन पायलट यांनी दिले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister modi accused congress of insulting gurjars amy
Show comments