भाषण सुरू असताना जोरदार घोषणाबाजी

नवी दिल्ली : मी देशासाठी जगतो, सत्तेसाठी राजकारणाचा खेळ करत नाही. विरोधकांना मतदारांनी वारंवार नाकारल्याने इथे घोषणाबाजी करून विरोधक बचावाचा मार्ग शोधत आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत टीका केली. मी एकटा विरोधकांना पुरून उरलो आहे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना आव्हान दिले.

Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
how many press conference taken by dr manmohan singh
Dr. Manmohan Singh Death: डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांत किती पत्रकार परिषदा घेतल्या? पंतप्रधान मोदींशी याची तुलना का केली जाते?
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी प्रामुख्याने काँग्रेसलाच लक्ष्य केले. त्यांच्या भाषणावेळी विरोधी सदस्य आसनांसमोरील मोकळय़ा जागेत येऊन अदानी प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी झालीच पाहिजे, अशी घोषणाबाजी करत होते. मोदींनी याकडे पूर्ण दुर्लक्ष करत सुमारे दीड तास भाषण केले. गेल्या नऊ वर्षांत सरकारने केलेल्या योजनांचा आढावा घेतानाच काँग्रेस, नेहरू-गांधी यांच्यावर टीका केली. भाषणाचा समारोप करताना मी एकटा सर्वाना पुरून उरलो आहे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना उत्तर दिले.

तत्पूर्वी आभार प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले, की काँग्रेसच्या काळात ६०० योजना गांधी-नेहरू कुटुंबाच्या नावाने चालवल्या गेल्या; पण गोरगरिबांपर्यंत विकास पोहोचला नाही. काँग्रेसने फक्त मतांचे राजकारण केले. आमच्या सरकारने मात्र तळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत विकास नेण्याचे ध्येय ठेवले आहे. आमचे ‘शत-प्रतिशत’ धोरण हाच खरा सेक्युलॅरिझम आहे. सरकारने जात, धर्म, पंथ, समूह असा कोणताही भेदभाव न करता लोकांपर्यंत योजना पोहोचवल्या आहेत. आम्ही भ्रष्टाचार संपुष्टात आणला आहे. तुष्टीकरणाचे राजकारण संपवले आहे. आम्ही भेदभावविरहित नवी कार्यसंस्कृती देशात रुजवत आहोत, असे प्रत्युत्तर मोदींनी दिले.

‘इंदिरा गांधींकडून घटनेचा दुरुपयोग’

राज्यांच्या अधिकारांवर गदा आणल्याच्या विरोधकांच्या आरोपांना मोदींनी चोख उत्तर दिले. मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, त्यामुळे संघ-राज्य व्यवस्थेचे महत्त्व जाणतो; पण इतिहासात डोकावून बघा. अनुच्छेद ३५६चा सर्वाधिक दुरुपयोग कोणी केला? केरळमध्ये माकप, तमिळनाडूमध्ये एमजीएम, आंध्र प्रदेशमध्ये एनटीआर ही लोकनियुक्त सरकारे, तर १९८०च्या दशकात शरद पवारांचे महाराष्ट्रातील सरकार कोणी बरखास्त केले? काँग्रेसच्या काळात ९० वेळा राज्य सरकारे बरखास्त झाली, त्यापैकी, इंदिरा गांधींनी ५० वेळा ती बरखास्त केली, असा हल्लाबोल मोदींनी केला.

काँग्रेसने योजना अडवल्या

काँग्रेसने योजना अडवण्याचे काम केले होते. स्वातंत्र्यलढय़ात आदिवासींचे योगदान बहुमूल्य होते, त्यांच्यापर्यंत आत्तापर्यंत विकास पोहोचायला हवा होता. काँग्रेसने त्यांना प्राधान्य दिले असते तर माझ्या सरकारला हे काम करावे लागले नसते. फेरीवाले, फुटपाथवरील किरकोळ विक्रेते अशा उपेक्षित वर्गाचे हित काँग्रेसने साधले नाही, असे मोदी म्हणाले. छोटे शेतकरी, महिला, तरुणांसाठी राबवल्या जात असलेल्या योजनांची माहिती देत मोदींनी काँग्रेसच्या नेत्यांना रोजगार आणि नोकरी यांतील फरकदेखील समजत नाही, अशी टीका केली. केंद्र सरकारने डिजिटल इंडिया, विज्ञान-तंत्रज्ञान, अपारंपरिक ऊर्जा, संरक्षण, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

जुन्या निवृत्तिवेतन योजनेला विरोध

काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याच्या धोरणाला मोदींनी विरोध केला. काँग्रेसचे नेते तात्कालिक राजकारण करण्यात धन्यता मानतात, त्यांच्या धोरणामुळे पुढील पिढय़ांचे किती नुकसान होईल, याचा विचार ते करत नाहीत. काँग्रेस सरकारांच्या आर्थिक बेशिस्तीचा मोठा फटका देशाला बसेल. राजकीय लाभाची वृत्ती सोडून देऊन राज्यांनी आर्थिक शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन मोदींनी केले.

खरगेंच्या आरोपांना उत्तर

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या भाषणात त्यांचे मूळ गाव असलेल्या कळबुर्गी येथील मोदींच्या दौऱ्याचा उल्लेख केला होता. २०१९ मध्ये गुलबर्गा मतदारसंघातून झालेल्या आपल्या पराभवाला भाजप कारणीभूत असल्याचा आरोप खरगे यांनी केला होता. त्यावर पंतप्रधान म्हणाले, की तिथे आम्ही लोकांसाठी काय काम केले बघा. कर्नाटकमध्ये १.७० कोटी जनधन खाती उघडली, त्यातील ८ लाख कळबुर्गीमध्ये आहेत. जनसामान्यांचे सक्षमीकरण होत असताना काहींची ‘खाती’ बंद झाली. तुमचे दु:ख मी समजू शकतो, असा टोला त्यांनी खरगे यांनी लगावला.

‘नेहरू’ आडनावाची लाज वाटते?

  • मोदींनी नाव न घेता राहुल गांधींवर टीका केली. योजनेच्या नावात नेहरू नसेल तर, काँग्रेस नेत्यांचे रक्त उसळत असे.
  • नेहरू नाव इतकेच प्रिय असेल तर आडनाव नेहरू का केले नाही? नेहरू आडनाव लावण्याची लाज वाटते का?
  • कुटुंबालाच नेहरू नाव नको आहे आणि आम्हाला नेहरूंवरून हिशोब मागता?
  • खेलरत्न पुरस्कार ध्यानचंद नावाने दिला तर बिघडले कुठे?
  • लक्षद्वीप समूहातील बेटांना परमवीरचक्र विजेत्या जवानांची दिलेली नावे देशासाठी गौरवाची बाब आहे, असे मोदी म्हणाले.

संसदेतील काही सदस्यांचे वागणे-बोलणे पाहून देशातील नागरिकांचा अपेक्षाभंग झाला आहे. तुम्ही माझ्या सरकारवर जितकी जास्त चिखलफेक कराल, तेवढे कमळ फुलेल! भाजपच्या यशामध्ये विरोधकांचा वाटा अधिक आहे. 

– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Story img Loader