जयपूर, पीटीआय

काँग्रेसने धर्माच्या आधारावर मुस्लिमांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. तसेच त्या पक्षाने काही ठरावीक लोकांना वाटण्यासाठी जनतेची संपत्ती ताब्यात घेण्याचे व्यापक षड्यंत्र रचल्याचा पुनरुच्चार केला. टोंक येथील सभेत त्यांनी काँग्रेसवर चौफेर टीका केली.

Places Of Worship Act 1991 Supreme Court.
Places Of Worship Act : मंदिर-मिशिदींविरोधात ‘तोपर्यंत’ दाखल होणार नाहीत नवे खटले, सर्वोच्च न्यायालयाने दिले महत्त्वपूर्ण निर्देश
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Anti corruption department filed case against Wangani Sarpanch Vanita Adhav for demanding bribe
लाच मागितल्याने महिला सरपंचावर गुन्हा, बदलापूर जवळच्या वांगणी ग्रामपंचायतीतील प्रकार
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
What is dispute over historic Durgadi Fort and what did court say while handing over fort to government
ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा वाद काय आहे? त्यावर मुस्लिमांचा दावा कसा? किल्ला सरकारच्या ताब्यात देताना न्यायालयाने काय म्हटले?
Religion shouldnt justify reservation
इथे मुद्दा मुस्लिमांच्या लांगूलचालनाचा नसून, आरक्षणाच्या निकषांचा आहे…
provide government guest houses for interfaith couples says bombay high court
आंतरधर्मीय जोडप्यांसाठी अतिथीगृहे उपलब्ध करून द्या; उच्च न्यायालयाची सूचना
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी

काँग्रेसच्या राजवटीत एखाद्याला आपल्या धर्माचे पालन करणेही कठीण होते. त्यांच्या सरकारमध्ये हनुमान चालीसा पठणही गुन्हा ठरला असा आरोप पंतप्रधानांनी केला. मंगळवारी हनुमान जयंती असल्याचा संदर्भ येथे होता. काँग्रेसने २००४ मध्ये केंद्रात सरकार स्थापन केल्यानंतर आंध्र प्रदेशात अनुसूचित जाती-जमातींचे आरक्षण कमी करून ते मुस्लिमांना दिले. मात्र आमच्या सरकारमध्ये दलित-आदिवासींचे आरक्षण बंद होणार नाही किंवा धर्माच्या आधारावर भेद केला जाणार नाही ही मोदींची हमी असल्याचे स्पष्ट केले. संपत्तीच्या फेरवाटपाचा मुद्दा पंतप्रधानांनी पुन्हा उपस्थित करत, काँग्रेस संपत्ती हिरावून काही ठरावीक लोकांना देईल असा आरोप केला.

हेही वाचा >>>धारवाड हत्येचा तपास सीआयडीकडेच विशेष न्यायालय स्थापण्याची कर्नाटक मुख्यमंत्र्यांची घोषणा, मुस्लीम संघटनांकडून तीव्र निषेध

काँग्रेसने २००४ केंद्रात सरकार स्थापन झाल्यावर आंध्रमध्ये अनुसूचित जाती-जमातींचे आरक्षण कमी करून मुस्लिमांना दिले. देशभर त्यांना हे प्रारूप लागू करायचे होते. २००४ ते २०१० या काळात चार वेळा त्यांनी आंध्र प्रदेशात मुस्लिमांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. मात्र कायदेशीर अडचणींमुळे त्यांना हे लागू करता आले नाही. २०११ मध्ये काँग्रेसने हे प्रारूप देशभर लागू करण्याचा प्रयत्न केला. अनुसूचित जाती-जमाती तसेच इतर मागासवर्गीयांचे आरक्षण मतपेढीच्या राजकारणासाठी इतरांना देऊ केले. त्या वेळी घटनेची तसेच बाबासाहेब आंबेडकरांची त्यांना चिंता नव्हती अशी टीका पंतप्रधानांनी केली. कर्नाटकमध्ये जेव्हा भाजप सरकार आले त्या वेळी पहिल्यांदा आम्ही मुस्लीम आरक्षण रद्द केले.

काँग्रेस तसेच त्यांच्या मित्रपक्षांचे मतपेढीचे राजकारण उघड झाल्याचा आरोप बंसवरा येथील सभेत पंतप्रधानांनी केला. आम्ही काँग्रेसवर आरोप करताच त्यांचा थयथयाट सुरू झाला असा टोला मोदींनी लगावला.

Story img Loader