रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी मंगळवारी लोकसभेत सादर केलेल्या चालू आर्थिक वर्षासाठीच्या रेल्वे अर्थसंकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. या अर्थसंकल्पातून रेल्वेचा विस्तार होणार असून, विकासही साधणार असल्याचे मोदी यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले.
ते म्हणाले, भारतीय रेल्वे केवळ प्रवासी ने-आण करण्याचे साधन नसून, ते देशाच्या विकासाचे इंजिन आहे. देशाच्या विकासामध्ये रेल्वे महत्त्वाची भूमिका बजावते. सदानंद गौडा यांनी सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पातून पारदर्शकतेला आणि एकात्मतेला बळ मिळाले आहे. या अर्थसंकल्पात तंत्रज्ञानाचा परिणामकारकपणे वापर करण्यावर भर देण्यात आला आहे. रेल्वेचा पाया मजबूत करण्यावर अर्थसंकल्पात विचार केला असल्याचेही त्यांनी सांगितले.
आणखी वाचा