पीटीआय, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शनिवारी अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे आगमन झाले. या दौऱ्यात ते अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत. ‘क्वाड’ राष्ट्रांच्या वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्याबरोबरच ते संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतही भाषण करणार आहेत.

हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातील शांतता आणि समृद्धीवर लक्ष केंद्रित करणारे समविचारी देशांचे एक प्रमुख व्यासपीठ म्हणून ‘क्वाड’ उदयास आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी सांगितले.

हेही वाचा >>>श्रद्धा वालकर हत्याकाडांची पुनरावृत्ती; फ्रीजमध्ये आढळले महिलेच्या शरीराचे २० तुकडे, कुठे घडली घटना?

विल्मिंग्टन, डेलावेअर येथे ‘क्वाड’ देशांची शिखर परिषद आणि न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र आमसभेच्या ‘भविष्यातील शिखर परिषदे’दरम्यान पंतप्रधान मोदी इतर जागतिक नेत्यांबरोबरही स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत. याशिवाय पंतप्रधान न्यूयॉर्कच्या शेजारील लाँग आयलंड शहरात परदेशस्थ भारतीयांशी संवाद साधतील. कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि सेमिकंडक्टर्स यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांबरोबरच्या कार्यक्रमातही पंतप्रधान मोदी सहभाग घेणार आहेत.