Modi Birthday Special, 17 September: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७२ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने देशभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते चित्ते सोडण्यात येणार आहेत. यासाठी नामिबियातून ८ चित्ते कुनो अभयारण्यात दाखल झाले आहेत.

PM Modi Birthday Special: ना घर, ना बंगला, ना गाडी…आमदार, खासदारांपेक्षाही कमी आहे पंतप्रधान मोदींची एकूण संपत्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ऐतिहासिक करण्यासाठी भाजपाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. ‘सेवा आणि समर्पण’ या २१ दिवसांच्या अभियानाची भाजपाकडून आजपासून सुरुवात करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत करोना लसीकरणाचा विक्रम करण्याचे उद्दिष्ट भाजपाचे आहे. पंतप्रधान मोदी यांचे जीवन आणि नेतृत्वावर आधारीत एका प्रदर्शनाचे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते आज दिल्लीतील भाजपा मुख्यालयात उद्घाटन होणार आहे. देशातील इतर राज्यांमध्येही अशाच प्रकारच्या प्रदर्शनांचे आयोजन भाजपाकडून करण्यात आले आहे.

Video : “मी तुम्हाला आत्ता वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकत नाही, पण…”, व्लादिमीर पुतीन यांनी मोदींना सांगितली रशियातील ‘ती’ प्रथा!

पंतप्रधानांचा वाढदिवस ‘सेवा पकवाडा’ या कार्यक्रमाच्या रुपात गरिबांच्या कल्याणासाठी समर्पित करण्यात येईल, अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस आणि खासदार अरुण सिंह यांनी दिली आहे. “या कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य, रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. २०२५पर्यंत ‘टीबी मुक्त भारत’ या पंतप्रधानांच्या ध्येयासाठीही भाजपा कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत. या मोहिमेअंतर्गत भाजपा नेते आणि कार्यकर्ते वर्षभर एका रुग्णाची सेवा करणार आहेत”, अशी माहिती सिंह यांनी दिली आहे. दरम्यान, भाजपाकडून आज देशभरात स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे. याशिवाय १० लाख पिंपळाची झाडे लावण्याचे उद्दिष्टही भाजपाचे आहे.

Story img Loader