Modi Birthday Special, 17 September : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७२ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने देशभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पटनायक यांनी ओडिशातील पुरी बीचवर नरेंद्र मोदींचे पाच फूट वाळूचे शिल्प बनवले आहे. एवढच नाही तर मातीच्या चहाच्या कपांचा वापर करुन त्यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. यासाठी त्यांनी १ हजार २१३ कपांचा वापर केला आहे.

हेही वाचा- PM Modi Birthday Special: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ७२ वा वाढदिवस, देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

चहा विक्रेते ते पंतप्रधान पदापर्यंतचा मोदींचा प्रवास,

सुदर्शन पटनायक यांनी पंतप्रधान मोदींचा ५ फूट उंच वाळूचा पुतळा बनवण्यात आला आहे. या शिल्पासाठी त्यांनी सुमारे पाच टन वाळू वापरण्यात आली आहे. पटनायक यांनी मोदींच्या प्रत्येक वाढदिवसाला वाळूची वेगवेगळी शिल्पे बनवली आहेत. दरवर्षी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला पटनायक वेगवेगळ्या प्रकारे वाळूची शिल्पे बनवतात. यावर्षी पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सुदर्शन म्हणाले, ‘आम्ही वाळूच्या शिल्पात मातीच्या चहाचे कप वापरून मोदींचा चहा विक्रेता ते भारताचे पंतप्रधान असा प्रवास दाखवला आहे. आज पुन्हा एकदा आम्ही आमच्या कलेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देत आहोत.

हेही वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत? मग फक्त ‘या’ स्टेप्स वापरून…

सुदर्शन यांचा ६० हून अधिक वाळू कला स्पर्धेत सहभाग

पद्मश्री सुदर्शन यांनी जगभरातील ६० हून अधिक आंतरराष्ट्रीय वाळू कला स्पर्धा आणि महोत्सवांमध्ये भाग घेतला आहे. यासोबतच त्यांनी देशासाठी अनेक पुरस्कारही जिंकले आहेत. पटनायक आपल्या कलेमुळे अनेकदा चर्चेत राहतात.