पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी या वर्षांच्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्या बालकांशी संवाद साधला. यावेळी मोदी यांनी मुलांशी संगीत, संस्कृती, सौरऊर्जा आणि क्रीडा यासारख्या विषयावर आपले विचारही मांडले. पंतप्रधानांच्या ‘७, लोककल्याण मार्ग’ या अधिकृत निवासस्थानी या अनौपचारिक गप्पा रंगल्या. यावेळी त्यांनी मुलांना स्मरणिकाही दिल्या.

या वर्षी १८ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील १९ मुलांना राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात आला. त्यामध्ये नऊ मुले आणि १० मुलींचा समावेश आहे. या बालकांनी दाखवलेले असामान्य धैर्य, कलात्मक पराक्रम, नावीन्यपूर्ण विचार आणि निस्वार्थ सेवा याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.मुलांनी पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या यशोगाथा सांगितल्या. तसेच त्यांनी पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याचीही संधी साधली. यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना, मोदी यांनी आपल्याला संगीताची आवड असल्याचे सांगितले. त्याचा ध्यानधारणेसाठी उपयोग होत असल्याची माहिती त्यांनी दिली.