नवी दिल्ली : देशातील जनतेकडून ८०-९० वेळा नाकारले गेलेले विरोधक स्वत:च्या राजकीय लाभासाठी हुल्लडबाजी करून संसदेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केला. संसदेमध्ये विरोधी पक्ष काय काम करतो हे लोक पाहत असतात. त्यानंतर मग, वेळ आली की लोक त्यांना धडा शिकवतात, अशा शब्दांत पंतप्रधानांनी टीकास्त्र सोडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. दोन्ही सभागृहांचे कामकाज चालू होण्यापूर्वी संसदेच्या आवारात मोदींनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांच्या संसदेच्या कामकाजामध्ये अडथळा आणण्याच्या प्रवृत्तीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. अदानी समूहाचे लाचखोरी प्रकरण, मणिपूरमधील हिंसाचार आदी अनेक महत्त्वाचे मुद्दे सभागृहाचे कामकाज सुरू होताच मांडले जातील, असे काँग्रेसच्या नेत्यांनी रविवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्येच स्पष्ट केले होते. विरोधकांच्या या आक्रमक भूमिकेचा अंदाज घेत मोदींनी विरोधकांना आधीच खडेबोल सुनावले.

हेही वाचा >>>Revanth Reddy : तेलंगणा सरकारने नाकारली अदाणी फाउंडेशनची १०० कोटींची देणगी! रेवंत रेड्डींनी सांगितल कारण

लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेने ‘एनडीए’ला बहुमत मिळवून दिले. हाच कल हरियाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतही पाहायला मिळाला आहे. दोन्ही राज्यांमध्ये भाजप आघाडीला प्रचंड बहुमत मिळाले. लोकांनी विरोधकांना नाकारले आहे. त्यामुळे लोकांच्या आशा-आकांक्षांच्या पूर्तीसाठी विरोधकांनी कष्ट करण्याची गरज आहे. संसदेमध्येही महत्त्वाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली पाहिजे, त्यासाठी विरोधकांनीही चर्चेत सहभागी झाले पाहिजे, असे मोदी म्हणाले. विरोधकांमधील काही सदस्यांची वर्तणूक योग्य असून कामकाज सुरळीतपणे झाले पाहिजे असे त्यांनाही वाटते. संसदेमध्ये नव्या सदस्यांना बोलण्याची संधी दिली जात नाही. जुन्या सदस्यांनी नव्या पिढीला घडवले पाहिजे, त्यांच्याकडे नव्या कल्पना असू शकतात म्हणूनच त्यांना बोलण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे, असा सल्ला मोदींनी विरोधकांना दिला.

हेही वाचा >>>Parliament Winter Session : संसदेच्या हिवाळी अधिवेशनला सुरुवात; भाजपाला ‘या’ मुद्द्यांवर घेरणार विरोधक

राष्ट्रपतींकडे संविधान दिन सोहळ्याचे नेतृत्व

जुन्या संसद भवनातील मध्यवर्ती सभागृहात मंगळवारी होणाऱ्या ७५ व्या संविधान दिन सोहळ्याचे नेतृत्व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार असल्याचे सरकारने सोमवारी जाहीर केले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे देखील या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. दरम्यान, ‘इंडिया’ आघाडीने विरोधी पक्षांच्या नेत्यांना संविधान दिनाच्या समारंभात बोलू देण्याची विनंती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

(विरोधी पक्षांनी जनतेच्या भावनांचा आदर केला पाहिजे. लोकशाही मूल्याचे पालन केले पाहिजे. संसदेचे कामकाज शांततेने चालले पाहिजे, त्यासाठी विरोधकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान)