पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी महाकुंभावर टीकाटिप्पणी करणाऱ्या नेत्यांच्या वक्तव्यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला. ‘गुलाम मानसिकता’ असलेले लोक परदेशी शक्तींच्या पाठिंब्याने देशाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांवर आक्रमण करीत असल्याची टीका त्यांनी केली.मध्य प्रदेशातील छतरपूर येथे बागेश्वर धाम वैद्याकीय आणि विज्ञान संशोधन केंद्र आणि कर्करोग रुग्णालयाचे रविवारी उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ ‘एकतेचा महाकुंभ’ असल्याचे प्रतिपादन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाकुंभमध्ये गैरव्यवस्थापन आणि चेंगराचेंगरीच्या घटनांचा दाखला देत महाकुंभला ‘मृत्यू कुंभ’ संबोधल्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर मोदींचे हे वक्तव्य आले आहे.

आजकाल आपण पाहतो की आपल्या धर्माची खिल्ली उडवणाऱ्या नेत्यांचा एक गट आहे. ते युनिट तोडण्यात वाकलेले आहेत आणि लोकांमध्ये फूट पाडण्यात गुंतलेले आहेत. अनेकवेळा परदेशी शक्तीही या लोकांना पाठिंबा देऊन देश आणि धर्म कमकुवत करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात.  नरेंद्र मोदी, पंतप्रधान

‘फूट पाडणे हाच त्यांचा अजेंडा’

हिंदू धर्माचा द्वेष करणारे हे लोक शतकानुशतके कोणत्या ना कोणत्या वेशात जगत आहेत. गुलामगिरीच्या मानसिकतेने वेढलेले हे लोक आपल्या मठांवर, मंदिरांवर, आपल्या संतांवर, संस्कृतीवर आणि तत्त्वांवर हल्ले करत राहतात असे सांगतानाच हे लोक आपले सण, परंपरा आणि चालीरीतींचा गैरवापर करतात. पुरोगामी असलेल्या धर्म आणि संस्कृतीवर चिखलफेक करण्याचे धाडस ते दाखवतात. आपल्या समाजात फूट पाडणे आणि त्याची एकता तोडणे हा त्यांचा अजेंडा आहे.