पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या तीन राष्ट्रांच्या भेटीमध्ये सर्वात शेवटी आता ऑस्ट्रोलियाला भेट देणार आहेत. याआधी जपान आणि पापुआ न्यू गिनिआ या देशांना मोदींनी भेटी दिल्या आहेत. आता या मोदींच्या यंदाच्या दौऱ्यातील शेवटचा देश अर्थात ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये नरेंद्र मोदी जाणार असून त्याआधी तिथल्या स्थानिक भारतीयांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. सिडनीतील मराठी असोसिएशनकडूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सिडनी दौऱ्याचं स्वागत करण्यात आलं आहे.

मोदी तीन दिवसांच्या विदेश दौऱ्यावर आहेत. यामध्ये सर्वात आधी मोदींनी जपानला भेट दिली. तिथे उच्चपदस्थ बैठकांनंतर त्यांनी पापुआ न्यू गिनी देशाला भेट दिली. या भेटीत मोदींचा त्या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून सिडनीमध्ये ते उतरणार आहेत. त्यांच्या सिडनीत पोहोचण्याआधीच स्थानिक भारतीय लोकांमध्ये मोदींच्या स्वागताचा उत्साह पाहायला मिळत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातला व्हिडीओ पोस्ट केला आहे. “खुशिया हमें उम्रभर की दे दी, आप की जयजयकार हो मोदी”, असं म्हणत स्थानिक भारतीयांकडून मोदींचं स्वागत केलं जात आहे.

Maharashtra Breaking News Live Updates in Marathi
Maharashtra Breaking News Updates : नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण, बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कोणाला पाठिंबा…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Prithviraj Patil asserted that protection of democracy and freedom is a salute to Gandhiji
लोकशाही रक्षण हेच गांधीजींना अभिवादन- पृथ्वीराज पाटील
PM Narendra Modi
“मोदी व न्यायाधीशांना मारण्यासाठी पाण्यात विष…”, पंतप्रधानांचा केजरीवालांच्या ‘त्या’ वक्तव्यावर पलटवार
Shivendra Singh Raje, Guardian Minister ,
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या स्वागताला ‘उदयनराजे मित्र समूह’
Loksatta chawadi Ahilyanagar uday samant State Environment Minister Shambhuraj Desai Satara
चावडी: योग्य वेळी योग्य भूमिका
Mumbai Cop’s Soulful Flute Cover On Ae Watan
‘ऐ वतन – वतन मेरे आबाद रहे तू’…. मुंबई पोलिसाने सादर केले बासरी वादन; Viral Videoने जिंकले भारतीयांचे मन
Prime Minister Narendra Modi statement regarding Washim
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले वाशीमचे कौतुक; “माझ्यासह सगळ्याच भारतीयांना आनंद…”

“आम्ही खूप एक्साईट आहोत. ते गेल्या वेळी २०१४ मध्ये आले, पण तेव्हा आम्ही फार लांबून त्यांना पाहिलं होतं. पण यावेळी आम्ही त्यांना जवळून बघणार आहोत”, अशी प्रतिक्रिया तिथल्या एका स्थानिक भारतीय महिलेनं दिल्याचं व्हिडीओत दिसत आहे. “आम्ही त्यांची उत्सुकतेनं त्यांची वाट पाहात आहोत. आम्ही सिडनीच्या मराठी असोसिएशनच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यासाठी आलो आहोत. सर्व महाराष्ट्रीयन व्यक्तींकडून आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत”, असं म्हणत तिथल्या महाराष्ट्र असोसिएशनच्या एका महिला सदस्यानं मोदींच्या स्वागताचा उत्साह व्यक्त केला!

“ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण आम्हा सर्वांच्या हृदयावर राज्य करतात. त्यांनी आज भारताला एक नवीन ओळख दिली आहे. भारत आज सुपरपावर होत असल्याचं सर्व श्रेय मोदींना जातं. मी २६ वर्षांपासून इथे शाळा चालवत आहे. मोदी आज इथे येत आहेत हे आमच्या मुलांसाठी फार महत्त्वाचं आहे. कारण आज आमची मुलंही त्यांना भेटणार आहेत”, असं म्हणत मोदींनी भारताला नवी ओळख दिल्याची प्रतिक्रिया एका महिला सदस्याने दिली आहे.

Story img Loader