हनुमान जयंतीच्या ( Hanuman Jayanti ) निमित्ताने गुजरामधील मोरबी ( Morbi, Gujarat ) गावात असलेल्या १०८ फुट उंच हनुमानाच्या मूर्तीचे उद्घाटन पंतप्रधान मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांनी रिमोट्वारे केले. अशीच एक उंच मूर्ती ही सिमलामध्ये असून आणखी दोन उंची मूर्तींची निर्मिती ही रामेश्वर आणि पश्चिम बंगलामध्ये केली जात असल्याची माहिती यानिमित्ताने मोदी यांनी दिली.
मोरबी हावात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोदी यांनी या कार्यक्रमाला आभासी उपस्थिती लावत उद्घाटन आणि भाषण केले. यानिमित्ताने पुन्हा एकदा आत्मनिर्भरचा सल्ला मोदी यांनी दिला. “आपण एकाच ठिकाणी राहून चालणार नाही, ते परवडणारे नाही. जागतिक परिस्थिती बदलत असून सर्व जग हे आपल्याकडे बघत आहे, आपण आत्मनिर्भर कसे बनत आहोत याकडे बघत आहे. आपण स्थानिक वस्तू, उत्पादने ही विकत घेतली पाहिजेत. स्थानिक लोकांनीच तयार केलेली उत्पादने ही आपल्या घरात असली पाहिजेत. यामुळे आपल्याच लोकांचा, स्थानिकांना रोजगार मिळेल. आपण पुढील २५ वर्षे स्थानिक उत्पादने विकत घेतली तर देशात कोणाही बेरोजगार रहाणार नाही”.
हनुमान जयंतीच्या निमित्ताने मोदी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. मोरबी इथल्या भव्य अशा हनुमान मूर्तीचे उद्घाटन हे रामभक्त, हनुमान भक्त यांना सुखावणारी घटना आहे. हनुमानामुळे प्रेरणा मिळते, शक्ती मिळते असंही मोदी म्हणाले.