पीटीआय, बडोदा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्या हस्ते सोमवारी बडोदा येथील ‘टाटा-एअरबस’ कारखान्याचे उद्घाटन झाले. या प्रकल्पात ‘सी-२९५’ या मालवाहू विमानांची निर्मिती करण्यात येणार आहे. एखाद्या खासगी कंपनीत तयार होणारे ‘सी-२९५’ हे देशातील पहिले विमान असेल. ‘हा कारखाना म्हणजे नव्या भारताचे प्रतिबिंब असल्याचे प्रतिपादन मोदी यांनी या वेळी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारत आणि स्पेनमधील भागीदारीने नवे वळण घेतल्याचे सांगून मोदी म्हणाले की, या प्रकल्पामुळे दोन्ही देशांतील संबंध केवळ अधिक दृढ होणार नाहीत, तर ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या मोहिमेला चालना मिळणार आहे. एखाद्या प्रकल्पाची कल्पना आणि त्याचे प्रत्यक्षात उतरणे यासाठी किती कमी वेळ लागतो ते या प्रकल्पामुळे दिसेल.
हेही वाचा : जनगणना पुढील वर्षी; पुढील लोकसभा निवडणूक मतदारसंघ पुनर्रचनेनंतर घेण्याचा विचार
या प्रकल्पाचे भूमिपूजन ऑक्टोबर २०२२ मध्ये झाले होते. या प्रकल्पावेळी नियोजन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीला होणारा उशीर टाळण्यावर भर दिल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. गुजरातचे मुख्यमंत्री असताना बंबार्डियर कंपनीचे रेल्वेचे डबे तयार करण्याचा प्रकल्प बडोदा येथे सुरू केल्याची आठवण त्यांनी सांगितली. या ठिकाणी तयार झालेले मेट्रोचे डबे ज्या पद्धतीने निर्यात होत आहेत, तसेच सी-२९५ विमानही निर्यात होईल, असे ते म्हणाले. ‘टाटा-एअरबस’सारखे प्रकल्प लाखो रोजगार तयार करतील, असे मोदींनी सांगितले. बडोदा येथील कारखान्यामध्ये विमानाचे १८ हजार सुटे भाग तयार होणार आहेत. लघु, मध्यम उद्याोगांना त्यामुळे मोठी संधी असेल, असे ते म्हणाले. मोदींनी या वेळी ‘एअरबस’ आणि ‘टाटा’ यांना शुभेच्छा दिल्या. तसेच, दिवंगत रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली.
महाराष्ट्राने गमावले, गुजरातने कमावले ! राज्यातील प्रस्तावित ‘टाटाएअरबस’ प्रकल्प गुजरातमध्ये
मुंबई : गुजरातमध्ये आज उद्घाटन करण्यात आलेला ‘टाटा-एअरबस’ प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्याची मूळ योजना होती. यासाठी नागपूरमध्ये जागाही निश्चित करण्यात आली होती. परंतु राज्यात सत्ताबदल होताच दिल्लीतून सूत्रे हलली आणि राज्यात होणारा हा प्रकल्प गुजरातमध्ये हलविण्यात आला.
महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यावर महायुतीचे सरकार राज्यात सत्तेत आले तेव्हा ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ आणि ‘टाटा-एअरबस’ हे दोन मोठे प्रकल्प गुजरातमध्ये हलविण्यात आले. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका झाली होती. महायुतीचे सरकार सत्तेत येताच महाराष्ट्रात येऊ घातलेले दोन मोठे प्रकल्प गुजरातमध्ये हलविण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. हे दोन्ही मोठे प्रकल्प गुजरातमध्ये हलविण्यात आल्याने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना सारवासारव करताना तारेवरची कसरत करावी लागली होती.
हेही वाचा : खासगीपणाचा घटनात्मक अधिकार मिळवून देणाऱ्या माजी न्यायमूर्ती के. एस पुट्टास्वामी यांचे निधन!
सुमारे २२ हजार कोटी गुंतवणुकीचा ‘टाटा-एअरबस’ हा प्रकल्प नागपूरजवळ सुरू करण्याची योजना होती. त्यासाठी फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता. परंतु नागपूरमध्ये हा प्रकल्प सुरू करण्याची योजना नव्हती, असा दावा उद्याोगमंत्री उदय सामंत यांनी केला होता.
महाराष्ट्र हिताशी तडजोड : जयराम रमेश
‘टाटा-एअरबस’ हा महाराष्ट्रात नागपूरजवळ प्रस्तावित असलेला प्रकल्प गुजरातमधील बडोद्याजवळ उभारण्यात आल्यावरून काँग्रेसने टीका केली आहे. महायुती सरकारने महाराष्ट्राच्या हिताशी तडजोड केल्याचा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी केला. महाराष्ट्रातील प्रकल्प व रोजगार हिरावणाऱ्या महाराष्ट्रद्रोही भाजप महायुतीला राज्यातील जनता निवडणुकीत धडा शिकवेल, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
हेही वाचा : “झारखंडमध्ये मुस्लिमांची संख्या वाढत आहे, कारण…”; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा?
‘सी२९५’ची वैशिष्ट्ये
● मध्यम आकाराचे सामरिक मालवाहू विमान
● वैद्याकीय आणीबाणी, संकटकाळात आणि सागरी टेहळणीसाठीदेखील वापर
● स्पेनमधील ‘सीएएसए’ कंपनीकडून सुरुवातीला रचना आणि निर्मिती
● भारताने खरेदी केलेल्या ५६ विमानांपैकी १६ थेट ‘एअरबस’कडून खरेदी, तर ४० विमानांची बडोद्यात निर्मिती