पीटीआय, धारवाड (कर्नाटक)
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परदेशात आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतीय लोकशाहीबाबत केलेल्या वक्तव्यावरून पंतप्रधान मोदींनी त्यांना रविवारी टीकेचे लक्ष्य केले. राहुल गांधी यांचे नाव न घेता ते म्हणाले, की जगातील कोणतीही शक्ती भारताच्या लोकशाही परंपरांचे नुकसान करू शकत नाही.
‘भारतीय लोकशाही धोक्यात आहे’ या राहुल यांच्या लंडनमधील वक्तव्याचा संदर्भ देत मोदींनी सांगितले की, हे वक्तव्य म्हणजे बाराव्या शतकातील समाजसुधारक बसवेश्वर, महान भारतीय परंपरा व कर्नाटकवासीयांसह समस्त भारतीयांचा अपमान आहे.
राहुल गांधींवर अप्रत्यक्ष टीका करताना मोदी म्हणाले, की ज्या लंडनमध्ये बसवेश्वरांचा पुतळा आहे, त्याच लंडनमध्ये भारताच्या लोकशाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाणे अत्यंत दुर्दैवी आहे. भारताच्या लोकशाहीची मुळे शतकानुशतके जपली गेली आहेत. जोपासली गेली आहेत. जगातील कोणतीही शक्ती भारताच्या लोकशाही परंपरांना हानी पोहोचवू शकत नाही. असे असतानाही काही व्यक्ती सातत्याने त्या विषयी प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. अशा व्यक्ती बसवेश्वरांचा, कर्नाटकवासीयांचा, भारताच्या महान परंपरांचा, भारतातील १३० कोटी सजग नागरिकांचा अपमान करत आहेत. कर्नाटकच्या जनतेने अशा लोकांपासून सावध राहावे, असे ते म्हणाले.
धारवाड येथील ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (आयआयटी) संकुलाचे उद्घाटन केल्यानंतर एका सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, की ‘आयआयटी-धारवाड’ला उत्तम भवितव्य आहे. दर्जेदार शिक्षणसंस्थांत गेल्या नऊ वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे.
मी भगवान बसवेश्वरांच्या भूमीत आल्याने मला धन्य वाटत आहे. ‘अनुभव मंडप’ची स्थापना हे भगवान बसवेश्वरांचे सर्वात महत्त्वाचे योगदान आहे. या लोकशाही व्यवस्थेवर जगभरात संशोधन केले जात आहे. अशा अनेक बाबींमुळेच भारत ही केवळ सर्वात मोठी लोकशाही नसून, ती लोकशाहीची जननी आहे. काही वर्षांपूर्वी लंडनमध्ये बसवेश्वरांच्या पुतळय़ाचे अनावरण करण्याचा बहुमान मला मिळाला होता. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान