पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हिमालयातील केदारनाथ मंदिराला भेट देऊन त्याठिकाणी रूद्राभिषेक करत पूजाअर्चा केली. बर्फवृष्टीमुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले केदारनाथ मंदिर आजपासून भाविकांच्या दर्शनासाठी खुले झाले. आज सकाळी आठ वाजता देहरादून येथे मोदींचे आगमन झाले. त्यानंतर साधारण नऊच्या सुमारास ते केदारनाथ मंदिरात पोहोचले. मोदी यांनी केदारनाथाचे दर्शन घेतल्यानंतर उपस्थित जनसमुदायालाही संबोधित केले. उद्या मी देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंडला भेट देणार आहे. या दौऱ्याची सुरूवात आज मी केदारनाथाचे दर्शन घेऊन केल्याचे मोदींनी यावेळी म्हटले. यावेळी मोदींनी तेथे उपस्थित असलेल्या भाविकांशी मुक्तपणे संवादही साधला. मोदींच्या केदारनाथ भेटीच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. याठिकाणी खास हेलिपॅड उभारण्यात आले होते. तसेच सुरक्षाव्यवस्थेसाठी केदारनाथ मंदिराजवळ सेफ रूम उभारण्यात आला होता. नरेंद्र मोदी थोड्याचवेळात हरिद्वार येथील बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठातील संशोधन केंद्राचे उद्घाटन करतील. त्यानंतर ते साधारण एकच्या सुमारास दिल्लीच्या दिशेने रवाना होतील.
केदारनाथ मंदिराला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील तिसरे पंतप्रधान आहेत. या आधी इंदिरा गांधी, व्ही.पी सिंह देखील पंतप्रधान असताना त्यांनी देखील केदारनाथ मंदिराला भेट दिली आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्यानंतर ५ मे रोजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जीदेखील उत्तराखंड दौ-यावर असणार आहेत. या दौ-यावेळी मुखर्जी केदारनाथव्यतिरिक्त ब्रदीनाथ येथेही भेट देणार आहेत.
Uttarakhand: Portals of the Kedarnath Temple to be thrown open for devotees today, Prime Minister Narendra Modi to offer prayers shortly pic.twitter.com/Et8Yh6Ek0O
— ANI (@ANI) May 3, 2017
#WATCH: Portals of Kedarnath to be thrown open to devotees today after being closed for winters,PM Modi to visit temple shortly #Uttarakhand pic.twitter.com/8D5ZRo8u5b
— ANI (@ANI) May 3, 2017
Prime Minister Narendra Modi arrives at Kedarnath Temple in Uttarakhand pic.twitter.com/A7tahiJo5o
— ANI (@ANI) May 3, 2017
Uttarakhand: Portals of Kedarnath thrown open, Prime Minister Narendra Modi visits the temple pic.twitter.com/7bYZNbW7Uk
— ANI (@ANI) May 3, 2017
Prime Minister Narendra Modi offers prayers at Kedarnath temple in Uttarakhand pic.twitter.com/lIAA4qYXfy
— ANI (@ANI) May 3, 2017
Prime Minister Narendra Modi at Kedarnath temple in Uttarakhand, gifted a miniature replica of the temple. pic.twitter.com/BJo32gbBA5
— ANI (@ANI) May 3, 2017
Uttarakhand: Prime Minister Narendra Modi greets the crowd at Kedarnath temple pic.twitter.com/ynwSAqSZl5
— ANI (@ANI) May 3, 2017
#WATCH: Prime Minister Narendra Modi greets the crowd at Kedarnath temple #Uttarakhand pic.twitter.com/UyOon4GrIq
— ANI (@ANI) May 3, 2017
नुकत्याच झालेल्या उत्तराखंडच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय प्राप्त केला होता. भाजपने ५६ जागांवर तर काँग्रेस ११ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेससाठी हा अत्यंत धक्कादायक निकाल ठरला होता. या विजयानंतर मोदींचा हा पहिलाच उत्तराखंड दौरा आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदींनी उत्तराखंडच्या जनतेला विकासाची साद घातली होती. उत्तराखंड ही देशातील पर्यटनाची राजधानी ठरू शकते. पण अकार्यक्षम काँग्रेस सरकारमुळे इथला विकास खुंटल्याचा मुद्या सातत्याने उपस्थित केला होता.