पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हिमालयातील केदारनाथ मंदिराला भेट देऊन त्याठिकाणी रूद्राभिषेक करत पूजाअर्चा केली. बर्फवृष्टीमुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले केदारनाथ मंदिर आजपासून भाविकांच्या दर्शनासाठी खुले झाले. आज सकाळी आठ वाजता देहरादून येथे मोदींचे आगमन झाले. त्यानंतर साधारण नऊच्या सुमारास ते केदारनाथ मंदिरात पोहोचले. मोदी यांनी केदारनाथाचे दर्शन घेतल्यानंतर उपस्थित जनसमुदायालाही संबोधित केले. उद्या मी देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंडला भेट देणार आहे. या दौऱ्याची सुरूवात आज मी केदारनाथाचे दर्शन घेऊन केल्याचे मोदींनी यावेळी म्हटले. यावेळी मोदींनी तेथे उपस्थित असलेल्या भाविकांशी मुक्तपणे संवादही साधला. मोदींच्या केदारनाथ भेटीच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. याठिकाणी खास हेलिपॅड उभारण्यात आले होते. तसेच सुरक्षाव्यवस्थेसाठी केदारनाथ मंदिराजवळ सेफ रूम उभारण्यात आला होता. नरेंद्र मोदी थोड्याचवेळात हरिद्वार येथील बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठातील संशोधन केंद्राचे उद्घाटन करतील. त्यानंतर ते साधारण एकच्या सुमारास दिल्लीच्या दिशेने रवाना होतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा