पीटीआय, वॉर्सा (पोलंड)

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन देशांच्या दौऱ्यावर असून पोलंडची राजधानी वॉर्सा येथे त्यांचे आगमन झाले. भारत आणि पोलंडमधील राजनैतिक संबंधांना ७० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पंतप्रधान पोलंडला गेले असून त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. तसेच गेल्या ४५ वर्षांतील भारतीय पंतप्रधानाने पोलंडला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

assam marwari community
Assam Row: आसाममध्ये बदलापूरसारखा उद्रेक; अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणात मारवाडी समाज लक्ष्य
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Video: एका वर्षाच्या मुलाने खेळणं समजून सापाला चावलं; पुढे झाला अनर्थ, डॉक्टरही हैराण
r.g. kar medical college
रुग्णालयाची सुरक्षा ‘सीआयएसएफ’कडे, कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरण, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी
Andhra Pradesh Reactor Exploded
Andhra Pradesh Explosion : आंध्र प्रदेशातील एका फार्मा कंपनीत भीषण स्फोट; १५ जणांचा मृत्यू, ४० जण गंभीर जखमी
PM Narendra Modi Italy Visit
Unified Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; नव्या पेन्शन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी!
Kolkata Rape and Murder Accused Sujoy Roy
Sanjoy Roy : “संजय रॉय आधी रेड लाईट एरियात गेला आणि…”, कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीबाबत माहिती समोर
R G Kar Hospital News
Kolkata Crime : “डॉ. संदीप घोष बेवारस मृतदेह विकायचे, आणि..” आर. जी. कर रुग्णालयातील माजी अधिकाऱ्याचा धक्कादायक आरोप

आपल्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी पोलंडचे अध्यक्ष अँड्रेझ सेबास्टियन डुडा यांची भेट घेतील, तसेच पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांच्याबरोबर शिखर बैठक घेतील. विमानतळावर पोलंडचे परराष्ट्र व्यवहार उपमंत्री वाल्दिस्लाव बार्टोस्व्हस्की यांनी त्यांचे स्वागत केले. तिथून हॉटेलवर पोहोचल्यानंतर भारतीय वंशाच्या नागरिकांनी त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. आपला हा दौरा दोन्ही देशांची मैत्री आणि द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणारा असेल, असे पंतप्रधानांनी ‘एक्स’ समाजमाध्यमावर लिहिले आहे. लोकशाहीसाठी दोन्ही देशांची परस्पर बांधिलकी हे नातेसंबंध आणखी बळकट करते, असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा >>>Andhra Pradesh Explosion : आंध्र प्रदेशातील एका फार्मा कंपनीत भीषण स्फोट; १५ जणांचा मृत्यू, ४० जण गंभीर जखमी

युक्रेनपर्यंत रेल्वेने प्रवास

पोलंडमधून पंतप्रधान युक्रेनची राजधानी कीव्हला भेट देणार आहेत. युद्धामुळे युक्रेनची हवाई सीमा बंद असल्याने ‘रेल फोर्स वन’ या रेल्वेगाडीतून १० तासांचा प्रवास करून ते कीव्हला जातील. या दौऱ्यात ते युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी द्विपक्षीय संबंध तसेच युद्धावर शांततामय तोडगा काढण्याच्या दिशेने दोघांमध्ये चर्चा होणार आहे. दीड महिन्यापूर्वी पंतप्रधान रशियाच्या दौऱ्यावर गेल्यानंतर अमेरिकेसह अन्य पाश्चिमात्य राष्ट्रांनी नाराजी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांच्या युक्रेन दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.